Nagpur Winter Session : माहितीये का? दहा दिवसांच्या अधिवेशनात काय काम झाले..?

Assembly : विधानसभेत सात हजारांपैकी 247 तारांकित प्रश्न स्वीकारले; उत्तर केवळ 34 प्रश्नांवर
Vidhan Bhavan Nagpur.
Vidhan Bhavan Nagpur.Sarkarnama
Published on
Updated on

Vidhan Bhavan : राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दहा दिवसात सरासरी दहा तासांचे कामकाज झाले आहे. गुरुवारपासून (ता. 7) सुरू झालेल्या अधिवेशनाचा बुधवारी (ता. 20) समारोप झाला. त्यानंतर विधिमंडळ सचिवालयाने प्रक्षत्य झालेल्या कामकाजाचा लेखाजोखा सादर केला.

विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तर विधान परिषदेत सभापती नीलम गोऱ्हे यांनी या विषयावर माहिती दिली. केवळ दोन आठवड्यांच्या हिवाळी अधिवेशनावर सुरुवातीपासून विरोधी पक्षाचे नेते असमाधानी होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी तर विधानसभेत सातत्याने अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली. कामकाज समितीच्या बैठकीतील निर्णयानंतरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

Vidhan Bhavan Nagpur.
Nagpur Winter Session : विधिमंडळ अधिवेशनावर शंभरावर मोर्चे, सव्वाशेच्या आसपास धरणं अन् 25 उपोषणांची धडक!

विधानसभेत हिवाळी अधिवेशन काळात एकूण 101 तास 10 मिनिटांचे कामकाज झाले. त्याची सरासरी काढल्यास दररोत 10 तास 5 मिनिटांचे कामकाज झाल्याची नोंद आहे. संपूर्ण राज्यातील विधानसभा आणि विधान परिषद आमदारांनी दोन्ही सभागृहांमध्ये आवर्जुन उपस्थिती नोंदविली. उपस्थितीची ही टक्केवारी 90.33 होती. अधिवेशन काळात 7 हजार 581 तारांकित प्रश्न सचिवालयाला प्राप्त झाले होते, राहुल नार्वेकर यांनी ही माहिती दिली.

एकूण प्राप्त तारांकित प्रश्नांपैकी 247 प्रश्न स्वीकारण्यात आलेत. स्वीकृत प्रश्नांपैकी केवळ 34 प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. केवळ दोन विषयांवर अल्पकालीन चर्चा करण्यात आली. प्राप्त लक्षवेधी सूचनांची संख्या 2 हजार 414 होती. त्यापैकी 337 स्वीकारण्यात आल्या. केवळ 70 लक्षवेधी सूचनांवर प्रत्यक्ष चर्चा झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दहा दिवसांच्या या अधिवेशन काळात 17 शासकीय विधेयकांवर विचार करण्यात आला. हे सर्व विधेयक मंजूर करण्यात आलेत. गेल्या अधिवेशन सत्रातील एक विधेयक नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आले. अशासकीय ठरावांबाबत 263 सूचना सचिवालयाला मिळाल्या होत्या. त्यापैकी 187 सूचना मान्य करण्यात आल्या.

विधानसभेचे कामकाजही बऱ्यापैकी चालले. परिषदेने कामकाजासाठी 10 बैठक घेतल्या. परिषदेत 71 तास 09 मिनिटांचे कामकाज दहा दिवसात झाले. कामाच्या तासांची दररोजची ही सरासरी 7 तास 6 मिनिटे होती. नीलम गोऱ्हे यांनी याबाबत सांगितले, अधिवेशन काळात सभागृहात 95 टक्क्यांवर सदस्यांची उपस्थिती होती. 1 हजार 819 तारांकित प्रश्न विधान परिषदेतून प्राप्त झाले होते. त्यापैकी 452 प्रश्न स्वीकारण्यात आलेत. प्रत्यक्षात 47 प्रश्नांवर उत्तरे देण्यात आली. 623 लक्षवेधी प्राप्त झाल्या होत्या. 142 सूचना स्वीकारण्यात आल्या. 30 सूचनांवर चर्चा झाली. विशेष उल्लेखाच्या 119 सूचना प्राप्त झाल्या होत्या. पटलावर प्रत्यक्षात 133 सूचना ठेवण्यात आल्या. 97 अल्पकालीन विषयांवर चर्चा करण्यात आली. विधानसभेत 14 विधेयकांना पारित करण्यात आले. एक विधेयक संयुक्त समितीने सादर केलेल्या अहवालानुसार संमत करण्यात आले. विधानसभेकडे तीन विधेयक शिफारसीशिवाय परत पाठविण्यात आलेत.

Edited by : Prasannaa Jakate

Vidhan Bhavan Nagpur.
Nagpur Winter Session: शेतकऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न; सरकारकडून लपवाछपवी?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com