Awhad Vs Mitkari : जितेंद्र आव्हाड सोमवारी मुंबईत तुतारी वाजवणार का? मिटकरींना प्रतीक्षा...

Amol Mitkari : तुतारीच्या तोंडातून आवाज काढावा, असं आव्हान मिटकरींनी आव्हाडांना दिलं आहे.
Amol Mitkari and Jitendra Awhad
Amol Mitkari and Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Awhad Vs Mitkari : जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी वाजवून दाखवावी. 1 लाख रुपये बक्षीस देतो, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केल्यानंतर आज एक लाखाचा चेक आमदार मिटकरींनी जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने लिहिला आहे. जर आव्हाडसाहेबांनी माझं चॅलेंज स्वीकारलं असेल तर मी पण तयार आहे. एक लाख रुपयांचा चेक माझा त्यांच्या नावाने तयार आहे, असं मिटकरी म्हणाले.

येत्या 26 तारखेपासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईला पार पडते आहे. विधान भवनात पहिल्याच दिवशी त्यांनी स्वतः पत्रकारांसमोर तुतारी वाजवावी आणि एक लाख रुपयांचा चेक माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याकडून घेऊन जावा, अशा शब्दांत मिटकरींनी आव्हाड यांना आव्हान दिले आहे. आमदार मिटकरी हे अकोल्यात आज (ता. 24) माध्यमांशी बोलत होते.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळालं आहे. शरद पवार गटाचं तुतारी चिन्हाचं आज किल्ले रायगडावर अनावरण होत आहे. या वेळी शरद पवार स्वत: उपस्थित आहेत. दरम्यान, या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी वाजवली आहे, तर दुसरीकडे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आव्हाडांचा व्हिडिओ दाखवत आव्हाडांवर मिश्किल भाषेत टीका केली आहे.

मिटकरी म्हणाले, ज्याला पन्नास हजार रुपये महिन्याच्या पगारावर अजितदादांनी ठेवले, असं वारंवार आव्हाड माझ्याबाबत म्हणतात. मात्र, मी दोन महिन्यांचा पगार आज आव्हाड यांना देत आहे. एक लाख रुपयांचा माझा चेक तयार आहे. जितेंद्र आव्हाड यांनी तो कधीही घेऊन जावा. फक्त तुतारी त्यांनी एकट्याने वाजवावी आणि तुतारीच्या तोंडातून आवाज काढावा, ही माझी अट आहे, असं थेट आव्हान मिटकरींनी आव्हाडांना दिलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amol Mitkari and Jitendra Awhad
Amol Mitkari : सत्तारूढ आमदार मिटकरींना कोणी केला धमकीचा फोन !

चिन्हांच्या लोकार्पणावर बोलताना मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे. मिटकरी म्हणाले, पक्षाच्या चिन्हाचं लोकार्पण होणं हीच मुळात चुकीची बाब आहे. हे चिन्ह मिळाल्यानंतर सर्वच समाधानी असते, तर कर्जत जामखेडचे आमदार त्याच्यानंतर घनसावंगीचे आमदार म्हणजे टोपेसाहेब आणि बाल मित्र मंडळ अध्यक्ष हे दोघेही तिथे अनुपस्थित का आहेत, असा सवाल मिटकरींनी विचारला आहे. एकटेच आव्हाड तेवढे तिथे दिसताहेत, मग बाकीचे कुठे आहेत. म्हणजे हा तुतारीचा निर्णय यांना पटला नाही का, असा सवाल आमदार रोहित पवार यांना मिटकरींनी विचारला आहे.

मिटकरींनी तुतारी या चिन्हाचं राजकीय स्वरूपाचं लॉन्चिंग रायगडसारख्या पवित्र मातीत करणे, अत्यंत चुकीचं आणि निषेधार्थ असल्याचं म्हटलं आहे. रायगडाच्या पायथ्याशी जर हा कार्यक्रम झाला असता तर त्याचं एक वेगळं समाधान वाटलं असतं, असेही मिटकरी म्हणाले. तुतारीचा आवाज निश्चितच घड्याळापेक्षा मोठा असतो. तुतारी साधारण शिवरायांच्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे दोन अडीच किलोपर्यंतची असायची.

ती तुतारी उचलायला मनगट लागते आणि मनगटावर घड्याळ असल्याशिवाय तुतारी वाजवू शकत नाही. कोणी तसा प्रयत्न केला असेल तर तो अत्यंत हास्यास्पद असल्याची टीकाही शरद पवार गटावर मिटकरींनी केली आहे. दरम्यान, स्पर्धेत आव्हाडांनी केलेलं चॅलेंज हे अपूर्ण आहे. केवळ सुरात सूर आव्हाडांनी मिसळला, असं मिटकरींनी म्हटलं आहे. कट्टर हिंदुत्ववादी सिद्ध करायला शंख वाजवावा लागताे आणि शिवरायांचा मावळा हे सिद्ध करायला तुतारी एकट्याने वाजवावी, असे आवाहन मिटकरींनी आव्हाडांना केले..

मार्च महिन्यात मोठे भूकंप !

आमदार मिटकरी म्हणाले, मार्च महिन्याची वाट बघा लोकसभेच्या पूर्वी तुम्हाला मोठ मोठे भूकंप झालेले दिसतील, मग तो मराठवाडा असो किंवा पश्चिम महाराष्ट्र असो. आज सकाळी कालवा समितीची बैठक पुण्याला होती. अजितदादांच्या नावाने रोज नाकाने कांदे सोलणारा बाल मंडळ अध्यक्षसुद्धा त्या बैठकीला होता. त्याच्यासोबत आमच्या पक्षाचे आमदार मकरंद आबा, अपक्ष आमदार संजय मामा शिंदे पण होते आणि राजेश टोपेसाहेब

Amol Mitkari and Jitendra Awhad
Rane And Mitkari : आधी राणे आणि आता मिटकरींमुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर भिडले !

कशासाठी भेटले होते ते कालव्याच्या समितीच्या संदर्भात ते भेटले नव्हते. ही भेट फार गोपनीय होती आणि हा फक्त ट्रेलर होता, पिक्चर फार मोठा आहे. तुम्ही थोडा धीर धरा तुम्हाला मार्च महिन्यामध्ये विध्वंस झालेला दिसेल, असा दावाही मिटकरींनी बोलताना केला. राजेश टोपेंच्या सोबत आणखी सहा जणांची लाइन आहे आणि एक नाव तर तुम्हाला जाहीर करून दाखविले. पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठे नाव आहे. ते आमच्यासोबत येणार असल्याचा दावा मिटकरींनी केला. त्याच्यामुळे 'आगे आगे देखो होता है क्या' ते मी आता सध्या काही सांगू शकत नाही, असे मिटकरी म्हणाले.

तुतारीची तुलना मुतारीशी हा अपमान !

सध्या सोशल मीडियावर तुतारीची तुलना मुतारी या शब्दाशी त्यांच्या स्टॉलर्समार्फत जर होत असेल, तर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन वाद्याचा अपमान आहे. एका अर्थाने तो मावळ्यांचा पण अपमान आहे. तुतारीची मुतारीची तुलना करणं हे अत्यंत नीच कृती आहे, असेही मिटकरी म्हणाले.

Edited By : Atul Mehere

R

Amol Mitkari and Jitendra Awhad
जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबत वाद ; ती ऑडिओ क्लीप व्हायरल | Amol Mitkari |

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com