Lok Sabha Election 2024 : बुलढाणा झेडपीच्या सीईओंची होणार बदली

Buldhana Zilla Parishad : गृहजिल्हा असल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी अन्य ठिकाणी पाठविण्याची मागणी. आझाद हिंद संघटनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार.
Vishal Narwade CEO Buldhana
Vishal Narwade CEO BuldhanaSarkarnama

Lok Sabha Election 2024 : बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची बदली होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच बुलढाणा जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेले नरवाडे हे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बुलढाणा जिल्हा परिषदेत रुजू झाले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वी गृहजिल्हा असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या सरकारकडून केल्या जात आहेत. अशातच नरवाडे यांचीही बदलीची मागणी पुढे आली आहे. आझाद हिंद संघटनेने ही मागणी केली आहे.

लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. लोकसभा निवडणूक आणि पारदर्शी वातावरणात पार पडाव्यात, यासाठी निवडणूक प्रक्रियेशी संबंधित महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळे याचा फटका राज्यातील अनेक अधिकाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. आता बुलढाणा येथे नुकतेच रुजू झालेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांचीही बदली होण्याची शक्यता आहे. नरवाडे यांचा बुलढाणा हा गृहजिल्हा आहे. त्यामुळेच त्यांच्याही बदलीचा आदेश निघण्याची दाट शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vishal Narwade CEO Buldhana
Buldhana Lok Sabha Constituency: 'वन मिशन बुलढाणा'च्या बळावर संदीप शेळके नशीब आजमावणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार एकाच पदावर तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेल्या किंवा गृहजिल्हा असलेल्या पोलिस दलातील आयुक्त, पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, उपायुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार अशा महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारकडून केल्या जात आहेत. लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. अशात बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आयएएस अधिकारी विशाल नरवाडे यांची नियुक्ती त्यांच्याच गृहजिल्हा बुलढाणा येथे झाली आहे. या नियुक्तीवर आक्षेप घेत आझाद हिंद संघटनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. सीईओ विशाल नरवाडे यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणीदेखील निवेदनात करण्यात आल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीशचंद्र रोठे यांनी दिली.

विशाल नरवाडे हे बुलढाणा जिल्ह्यातील धाड या गावचे मूळ रहिवासी आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात म्हणजे त्यांच्याकडे बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी आली. त्यांचे वडील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारीदेखील आहेत. त्यामुळे विशाल नरवाडे यांच्या नियुक्तीने आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांवर प्रभाव पडू शकतो व आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ शकते, असे राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर आता निवडणूक आयोग काय भूमिका घेते हे पाहावे लागणार आहे.

Vishal Narwade CEO Buldhana
Buldhana Congress : मोताळा नगरपंचायतीत काँग्रेसचा शिवसेनेला मोठा धक्का; सहा नगरसेवकांची घरवापसी

विशाल नरवाडे यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारताच शिस्त न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला. बुलडाणा जिल्हा परिषदेत अनेक कर्मचारी आणि अधिकारी वेळेवर येत नसल्याचे नव्या सीईओंच्या लक्षात आले. त्यामुळे सतत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी चांगलीच अद्दल घडविली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीचे प्रवेशद्वार हे सकाळी 09.50 वाजता बंद करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे लेटलतिफ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिल्याने या निर्णयाचा चांगला फायदा होत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

Vishal Narwade CEO Buldhana
Buldhana Forest : रोही, रानडुकराला मारण्यासाठी ‘फॉरेस्ट’ला ठोकले कुलूप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com