Buldhana Congress : राज्यात झालेल्या पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाने काँग्रेसला दणका देत जिल्ह्यातील महत्वपूर्ण मोताळा नगरपंचायतीमधील काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी आपल्याकडे खेचले होते. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी प्रवेश केला होता. आम्हाला शहरात विकासाचे गाजर दाखविल्यामुळे शिवसेनेत प्रवेश घेतला होते. मात्र ते सर्व स्वप्नच राहिले. त्यामुळे आम्ही घरवापसी करीत आहोत, असा पवित्रा घेत काल या आठपैकी सहा नगरसेवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश पुन्हा घरवापसी केली.
राज्यात जानेवारी 2023 मध्ये पदवीधर निवणुकीची रणधुमाळी सुरू असताना बुलढाण्यात काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसला खिंडार पाडत नगरसेवकांना आपल्या पक्षात खेचले. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या 12 पैकी तब्बल आठ सदस्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर विश्वास दर्शवित बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गायकवाड यांचे फोनद्वारे अभिनंदनही केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नगरसेवकांच्या वॉर्डातील विकास कामांसाठी नगरविकास खात्यातून निधी देण्याचेही एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले होते. मात्र जे ठरले होते तसे काहीच झाले नसल्याने हताश होऊन बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात त्यांच्याच कार्यालयात सहा नगरसेवकांनी घरवापसी करीत काँग्रेसमध्ये पुन्हा जाहीर प्रवेश केला. नगरसेवक शहनाज बी शेख सलीम, हसमद बी जलील खान, खातून बी शेख रशीद, शिला कैलास खर्चे, परवीन बी आसिफ आणि शेख तस्लीम शेख सलीम यांचा समावेश आहे.
घरवापसी करणारे नगरसेवक म्हणाले की, आम्हाला विकासाचे गाजर दाखवून आमचा प्रवेश घेण्यात आला होता. परंतु कुठल्याच प्रकारचा विकास झाला नसल्यामुळे आम्ही परत काँग्रेस पक्षामध्ये घर वापसी केली व यापुढे पुऱ्या ताकतीने तन-मन-धनाने काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी अहोरात्र काम करू, पक्ष विरोधी कोणतेही काम आम्ही करणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी काँग्रेस पक्षाच्यावतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ बुलढाणा शहर काँग्रेस अध्यक्ष दत्ता काकस, मोताळा नगराध्यक्ष माधुरी देशमुख, गटनेता रवी पाटील, नगर सेवक निना इंगळे, शेरू खान यांची उपस्थिती होती.
सुमारे एक वर्षापूर्वी झालेल्या मोताळा नगरपंचायतच्या निवडणुकीत 18 पैकी 12 जागा मिळवत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळविले होते. मात्र दिवंगत काँग्रेस नेते नाना देशमुख यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष माधुरी देशमुख यांना पुन्हा नगराध्यक्षपदी विराजमान केले गेल्याने त्याचवेळी पक्षांतरचे बीज रोवले गेले होते. नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश सोहळा झाल्यावर आमदार संजय गायकवाड यांनी भ्रमणध्वनीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत संपर्क साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रवेश केलेल्या सदस्यांना फोनवरुन शुभेच्छा देत नगरविकास विभागामार्फत विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले होते. मात्र तसे काहीही न झाल्याने नगरसेवकांची पुन्हा घरवापसी झाली.
2022 मध्ये झालेल्या मोताळा नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये जनमताचा कौल हा एकतर्फी काँग्रेसला होता. 12 ठिकाणी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आलेत. नंतरच्या काळात काही गैरसमज झालेत. अनेक ठिकाणी सामंजस्याचा अभाव राहिला. सरकार, प्रशासन, पदाधिकारी, नगरसेवक यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. त्या गैरसमजातून पक्षामध्ये फूट पडत आठ नगरसेवक हे दुसऱ्या बाजूला गेले. मात्र ‘सुबह का भुला शामको घर लौट आए, तो उसको भुला नही कहते’ अशा म्हणीचा दाखला देत सहा जण काँग्रेसमध्ये परत आले आहेत. पक्षांमध्ये ते आले त्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आता सर्व दहा नगरसेवक आपले आहे. त्यांना माझी सूचना माझा विनंती असेल की, आपण जनतेला दिलेले आश्वासन, आपला जाहीरनामा या अनुषंगाने त्यांनी उर्वरित काळामध्ये काम करावे. विकासाची कामे करावी, हक्काची काम करावी कुठलाही गैरसमज ठेऊ नये, अशी भावना बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.