Buldhana Lok Sabha Constituency: 'वन मिशन बुलढाणा'च्या बळावर संदीप शेळके नशीब आजमावणार

Lok Sabha Election 2024 : मागील अनेक महिन्यांपासून संदीप शेळके लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागलेले आहेत.
sandip shelake
sandip shelakesarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 :

बुलढाणा ( Buldhana ) जिल्हा हा तसा शिवसेनेचा ( Shivsena ) बालेकिल्ला. या जिल्ह्यामध्ये मागील 15 वर्षांपासून शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव ( Prataprao Jadhav ) हे सतत निवडून आलेले आहेत. 15 वर्षांचा कालावधी उलटला असला तरी अनेक गावांमध्ये अजूनही जाधव पोहोचले नसल्याने त्यांच्यावर मतदारांचा रोष आहे. तर, राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे बुलढाणा मतदारसंघातून लोकसभेचे उमेदवार असायचे. पण, राजेंद्र शिंगणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सहभागी झाले आहेत.

अजित पवारांचा राष्ट्रवादी हा पक्ष महायुतीत सामील आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने शिवसेनेची उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. अशातच 'वन बुलढाणा मिशन'चे संदीप शेळके यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळू शकते.

मागील अनेक महिन्यांपासून संदीप शेळके लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागलेले आहेत. आतापर्यंत 500 च्या वर गाव- खेड्यांपर्यंत ते पोहोचलेले आहेत. महिला मेळावे, रोजगार मेळावे, युवकांचे मेळावे आणि जनसंवाद यात्रा, असे कार्यक्रम आतापर्यंत शेळकेंनी घेतलेले आहेत. त्यामुळे संदीप शेळके हे नवीन उमेदवार म्हणून समोर येऊ शकतात.

sandip shelake
Yavatmal-Washim Lok Sabha Constituency : यवतमाळ-वाशीम मतदारसंघात शिवसेनेकडून संधीची संजय राठोड यांना अपेक्षा

नाव (Name)

संदीप रामराव शेळके

जन्मतारीख (Birth Date)

13 मार्च 1981

शिक्षण (Education) :

बीए

कौटुंबीक पार्श्वभूमी ( Family Background ) :

संदीप शेळके यांच्या पत्नीचे नाव मालती असून, त्या गृहिणी आहेत. त्यांना एक मुलगी आहे, तिचे नाव अनुष्का आहे. त्यांचे बंधू उपजिल्हाधिकारी असून, त्यांच्या वहिनी जयश्री शेळके काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. वडील शेतकरी तर, आई गृहिणी आहेत.

नोकरी किंवा व्यवसाय काय? ( Service/Business ) :

राजश्री शाहू महाराज सहकारी नागरी पतसंस्था, 'वन बुलढाणा मिशन लँड सोल्यूशन'चे संचालक आणि शेती.

लोकसभा मतदारसंघ कोणता? ( Lok Sabha Constituency ) :

बुलढाणा

राजकीय पक्ष कोणता? ( Political Party Affiliation ) :

अपक्ष

sandip shelake
Sunil Mendhe : तिकीट मिळणार अन् चार लाख मतांनी जिंकणारही; सुनील मेंढेंच्या कॉन्फिडन्सचे रहस्य काय?

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? ( Election Contested Or Political Journey ) :

संदीप शेळके यांनी आतापर्यंत कोणतीही निवडणूक लढवलेली नाही.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? ( Social Work in The Constituency) :

जिल्ह्यातील बहुतांश उपक्रमांत संदीप शेळके सहभागी होतात. आर्थिक स्थिती मजबूत असल्याने गरजूंना मदत करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. राजर्षी शाहू महाराज पतसंस्थेअंतर्गत 1500 कोटी रुपयांची उलाढाल होते. 1500 युवकांना प्रत्यक्ष व 10,000 युवकांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळवून दिला आहे. 35000 महिलांना बचतगटांच्या माध्यमातून 150 कोटींपर्यंत आर्थिक साह्य मिळवून दिले आहे. शिबिराच्या माध्यमातून 2023 मध्ये विक्रमी 3000 पेक्षा अधिक बाटल्या रक्तसंकलन केले. याशिवाय पेरणी महोत्सव, पोलिस भरती युवक सत्कार, भूसंपादन आंदोलनाला पाठिंबा, योग दिवसाचे दरवर्षी आयोजन, 15 ऑगस्टला घर तेथे राष्ट्रगीत उपक्रम, 15 ऑगस्टला लासूरा येथे मदतकार्य, जनतेचा जाहीरनामा कार्यक्रम, एक हजार युवकांसाठी रोजगार मेळावा, परिवर्तन यात्रा, आषाढी वारीचे आयोजन, महिला मेळाव्यांचे आयोजन आदी सामाजिक उपक्रमांमध्ये शेळके यांचा सक्रिय सहभाग असतो.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? ( Whether Contested 2019 Lok Sabha Election ) :

निवडणूक लढवली नव्हती

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? ( Reasons for Winning The Election Or Losing The Election ) :

निवडणूक लढवली नव्हती

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? ( Public Relation In Constituency ) :

जिल्ह्यातील प्रत्येक गावांत ओळखीचा माणूस अशी ख्याती शेळके यांनी मिळवली आहे. विविध मेळाव्यांच्या माध्यमातून ते जिल्हाभर प्रवास करत असतात. हजारो युवकांना रोजगार मिळवून दिल्यामुळे ते घराघरांत ते पोहोचलेले आहेत. याशिवाय महिला मेळाव्यांच्या आयोजनांच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम उभे केले आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्व गावांमध्ये त्यांचे नेटवर्क आहे. या जनसंपर्काच्या भरवशावर ते येत्या लोकसभा निवडणुकीत नशीब अजमावणार आहेत.

सोशल मीडियावरील अकाउंटबद्दल? ( Social Media Handles ) :

आपल्या प्रत्येक उपक्रमाची माहिती ते सर्व सोशल मीडिया हॅडलवरून देत असतात. यासाठी त्यांची एक टीम सतत कार्यरत असते. या माध्यमातून ते संबंधितांच्या प्रतिक्रियाही जाणून घेत असतात. व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, 'एक्स' यावर नेहमी कार्यरत असतात. मतदारसंघातील सोहळे असो किंवा कार्यकर्त्यांचे कौतुक सोशल मीडियावर त्यांची छायाचित्रे झळकत असतात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये ( Political Statements Made By Candidate ) :

संदीप शेळके यांनी आतापर्यंत वादग्रस्त विधान केलेले नाही. प्रक्षोभक विधानांपासूनही ते दूर राहिले आहेत.

राजकीय गुरु कोण? ( Political Godfather/Guru ) :

स्वयंभू नेता

सकारात्मक मुद्दे (Positive Points About candidate) :

राजर्षी शाहू महाराज पतसंस्थेच्यामार्फत जिल्ह्याभरात बचतगटांना कर्ज वाटप केलेले आहे. त्यामुळे हा जनसंपर्क आधीचाच आहे. याशिवाय वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून 1600 कोटी रुपयांचा व्यवसाय उभा करून अनेक बेरोजगारांना काम दिले आहे.

नकारात्मक मुद्दे ( Negative Points About Candidate ) :

संदीप शेळके यावेळी पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. यापूर्वी त्यांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते ( If Didn’t Get Chance To Contest Lok Sabha Election What Will Be The Consequences) :

महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळेल, अशी आशा संदीप शेळके यांना आहे. पण, तसे न झाल्यास ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील.

(Edited by - Akshay Sable)

sandip shelake
Loksabha Election 2024 : महायुतीकडून आणखी एका पाटलांच्या एन्ट्रीने 'धाराशिव'ला स्पर्धा तीव्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com