Bachchu Kadu Ayodhya Tour : बच्चू कडू निघाले अयोध्येला; सोयाबीन, कापूस आणि उसाचा प्रसाद चढवणार !

Bachchu Kadu in Ayodhya : ‘मेरी माटी मेरा खून’ असं अभियान आम्ही राबवत आहोत.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nagpur Political News : प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांच्या बहुचर्चित अयोध्या दौऱ्याला आजपासून (ता. २८) सुरुवात झाली आहे. त्यासाठी आज ते नागपुरात दाखल झाले. येथून उद्या (ता. २९) ते लखनौला जाणार असून, तेथून कारने अयोध्येला जाणार आहेत. (We are running a campaign called 'Meri Mati Mera Khoon')

अयोध्येला प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन सोयाबीन, कापूस आणि उसाचा प्रसाद चढवून शेतकऱ्यांच्या खुशालीसाठी मागणी करणार असल्याचे बच्चू कडूंनी आज नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, मौलाना अमर अली आणि मंदिराचे पुजारी रामचरणदास यांना इंग्रजांनी फासावर लटकवलं होतं. ते शहीद झाले होते. त्यांचं स्मारक झाले पाहिजे, ही आमची मागणी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ओबीसींना धक्का न लावता आरक्षण द्यावे

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक लोकांनी आपल्या जिवाचं बलिदान देत रक्त सांडवले. त्यांचं स्मरण राहावं म्हणून ‘मेरी माटी मेरा खून’ असं अभियान आम्ही राबवत आहोत. मनोज जरांगे यांनी आंदोलन करावं, पण त्या अगोदर सरकारशी समन्वय साधून कोणत्या अडचणी आहेत, हे सांगून आंदोलन केले तर सोपं जाईल. मराठा हा एका जातीचा किंवा धर्माचा विषय नाही, तर हे एक पद आहे. ओबीसी आरक्षणात काही अडचण न आणता कोटा वाढवून देता येत असेल, तर सरकारने नक्की द्यावा, असे बच्चू कडू म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात बैठक घेऊन समोर कसे जाता येईल, अशी रणनीती आखली पाहिजे. ही रणनीती शिवाजी महाराजांची होती. थेट हल्ला करण्यापेक्षा थोडं टप्प्याटप्प्याने गेलं तर चांगलं राहील. टोकाची भूमिका घेण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने आंदोलन नेले तर बरं होईल, असं मला वाटतं. काही लोकांना वाटतं की आरक्षण मिळाल्याबरोबर उद्याच नोकरी मिळेल, हा गैरसमज काढून टाका. आजही २० टक्के कंत्राटी कामगार आहेत. त्यांना कुठे आरक्षण आहे, असा सवाल आमदार कडू यांनी केला.

एका कुटुंबात चार चार जणांना नोकरी आहे. या नोकऱ्यांवर कुठेतरी बंदी आणावी लागेल. एका परिवारात एक किंवा दोनच लोक नोकरीला असायला पाहिजेत. संजय राऊत यांच्याबद्दल विचारले असता, ते सहा बॉलमध्ये एखादा नो बॉल व्हावा, म्हणून गुगली टाकत असतात. हल्ली टाकलेला त्यांचा बॉल हा नो बॉल आहे, त्याला काही अर्थ नाही, असे ते म्हणाले.

कार्तिकी एकादशी हा बराच लंबा पल्ला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच्यातून चांगला मार्ग काढतील. शिंदे साहेब म्हणजे एका हत्तीची ताकद आहे. ते काही मागे हटणारे नाही. राज्यात जे निगेटिव्ह वातावरण सध्या तयार केलं जातंय, त्याला पॉझिटिव्ह करण्यात शिंदे साहेबांचा हातखंडा आहे. खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री कसे असावे, जनतेशी संवाद साधून एका वर्षात त्यांनी हे दाखवून दिले आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Bacchu Kadu
कडू अधिकाऱ्यांवर बरसले ; बघा साताऱ्यात काय घडलं ? | Bacchu Kadu In Satara | #shorts

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.