Bachhu Kadu : बच्चू कडूंसाठी 'गोड' बातमी; हायकोर्टाचा दिलासा, बँकेच्या चाव्या सध्या तरी जवळच राहणार!

Bachhu Kadu : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणीस यांनी दिलेल्या अपत्रातेच्या आदेशाला स्थगिती देत बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा सहकारी बँकेचे संचालकपद कायम ठेवले आहे.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Bachhu Kadu : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांना मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणीस यांनी दिलेल्या अपत्रातेच्या आदेशाला उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांची अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा बँकेचे संचालकपद आणि अध्यक्षपद कायम राहणार आहे.

एका आंदोलनादरम्यान नाशिक येथे 2017 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात बच्चू कडू यांना 2021 मध्ये एक वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सहकारी बँकेच्या नियमानुसार एक वर्षाची शिक्षा झाल्यास संबंधित व्यक्ती संचालक म्हणून अपात्र ठरतो. बच्चू कडूंनी या प्रकरणात यापूर्वी उच्च न्यायालयात धाव घेतली होती तेव्हा न्यायालयाने शिक्षेला स्थगिती न देता केवळ शिक्षा निलंबित केली होती.

कायद्यानुसार स्थगिती मिळाली तरच संचालक म्हणून काम करता येते. हीच बाब हेरून विरोधी गटाने सहकार विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणीस यांनी बच्चू कडूंच्या अपात्रतेचा निर्णय दिला. या निर्णयाविरोधात कडूंनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. कडूंनी शिक्षेला स्थगिती आणि अंतरिम दिलासा देण्याची विनंती केली. परंतु, संचालक मंडळाने कॅव्हेट दाखल करून कोणताही निर्णय त्यांची बाजू ऐकल्याशिवाय देऊ नये, अशी मागणी केली होती.

Bacchu Kadu
Bacchu Kadu Disqualified : बच्चू कडूंना विभागीय सहनिबंधकांनी ठरवले अपात्र;आंदोलनाचा फटका? थेट भाजपवर आरोप!

यापूर्वी 19 जून रोजी या प्रकरणावर सुनावणी झाली तेव्हा अंतरिम स्थगिती देण्यास नकार देत संबंधितांना नोटीस बजावत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज या प्रकणाची सुनावणी झाली, यात उच्च न्यायालयाने बच्चू कडू यांना दिलासा दिला आहे. विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणीस यांनी दिलेल्या अपत्रातेच्या आदेशाला उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांची अंतरिम स्थगिती दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com