Bachchu Kadu News
Bachchu Kadu NewsSarkarnama

Bachchu Kadu News : " दुश्मन का दुश्मन दोस्त..." ; आमदार राणांच्या कानशिलात लगावल्याचा दावा करणाऱ्याची बच्चू कडूंनी घेतली भेट

Amravati Political News : आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्यात सत्तांतरानंतर वाद रंगला होता.
Published on

Amravati Politics : दुश्मन का दुश्मन दोस्त होता है, अशी हिंदीत एक म्हण आहे. सध्या युवा स्वाभिमान पक्षाचे नेते व बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांचे अनेक दुश्मन तयार झाले आहेत, नव्हे त्यांनी स्वत:हून तयार करून घेतल्याचे बोलले जाते. अशात आमदार राणांचा एक असाही दुश्मन आहे, ज्याने काही दिवसांपूर्वी त्यांच्या कानशिलात हाणल्याचा दावा केला होता. हा दावा करणाऱ्या व्यक्तीची प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी भेट घेतली.

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी येथे ११ सप्टेंबर रोजी युवा स्वाभिमान पक्षाने दहीहंडीचे आयोजन केले होते. त्यावेळी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात अपशब्दांचा वापर केला. यावरून तेथे वाद निर्माण झाला. उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते महेंद्र दिपटे (Mahendra Dipate) आणि आमदार राणा या वेळी थेट समोरासमोर भिडले. या झटापटीत आपण राणांच्या कानशिलात लगावल्याचा दावा दिपटे यांनी केला. या वेळी दिपटे यांनाही राणा समर्थकांकडून मारहाण झाली होती.

Bachchu Kadu News
Amit Shah News : महिला आरक्षण आमच्यासाठी राजकीय नाही, तर...; अमित शाह विरोधकांवर कडाडले

मारहाणीत दिपटे यांच्या चेहऱ्यावर दुखापत झाली. त्यांचा रक्तदाबही कमी झाला. दिपटे यांची प्रकृती बिघडली. हे प्रकरण नंतर पोलिसांपर्यंतही गेले. सध्या प्रकृती ठीक नसल्याने दिपटे घरीच उपचार घेत आहेत. अशात आमदार बच्चू कडू यांनी दिपटे यांचे घर गाठत त्यांची आस्थेने विचारपूस केली.

आमदार बच्चू कडू आणि महेंद्र दिपटे हे पूर्वीचे सहकारी आहेत. नव्वदीच्या दशकात बच्चू कडू शिवसेनेत असताना त्यांनी सोबत काम केले आहे. राणांसोबत झालेल्या वादाची माहिती मिळाल्यानंतर बच्चू कडू यांना जुन्या मैत्रीचे स्मरण झाले व ते तातडीने दिपटे यांच्या घरी पोहोचले.

आमदार बच्चू कडू(Bachchu Kadu) व आमदार रवी राणा(Ravi Rana) यांच्यात सत्तांतरानंतर वाद रंगला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या वादात मध्यस्थी करावी लागली होती. लोकसभा निवडणुकीत पैसे वाटपाबाबत खासदार नवनीत राणा यांनी काँग्रेसच्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप केल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली व पुन्हा राणा विरुद्ध बच्चू कडू या वादाला नव्याने सुरुवात झाली.

अशात बच्चू कडू आपला जुना सहकारी मित्र महेंद्र दिपटे याला भेटल्याने अमरावती जिल्ह्यात पुन्हा राणा विरुद्ध कडू हा वाद पेटतो की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीकडे सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. खासदार नवनीत राणा आणि अनेक नेत्यांमध्ये सध्या वाद रंगत आहे. आता राणा आणि अमरावती जिल्ह्यातील आणखी एका नेत्यामध्ये कडवटपणा निर्माण झाला आहे. 

(Edited By Deepak Kulkarni)

Bachchu Kadu News
Bhandara Shinde Group News : शिंदेंच्या आमदाराच्या मतदारसंघात भाजपची मतपेरणी, पण शिंदे जागा सोडतील का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com