रस्तानिधी अपहार : मी आंबेडकरांना फोन केला अन॒ भेटायलाही गेलो; पण ते भेटले नाहीत...

त्या दिवशी बच्चू कडू पदावर राहणार नाही : प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर उत्तर
Prakash Ambedkar-Bachchu Kadu
Prakash Ambedkar-Bachchu Kadusarkarnama

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी रस्त्याच्या निधीबाबत माझ्यावर केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. निधी अपहाराचा प्रश्नच नाही. मी त्यांना दोन-तीन वेळा फोनही केला होता. मी त्यांना भेटायला गेलो होतो. मात्र, ते भेटले नाहीत. ज्या दिवशी मी निधी चोरेन, त्या दिवशी हा बच्चू कडू (Bachchu Kadu) पदावर राहणार नाही, अशा शब्दांत शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ॲड. आंबेडकरांना आव्हान दिले आहे. (Bachchu Kadu said on allegation of corruption made by Prakash Ambedkar)

रस्त्याच्या निधीचा बच्चू कडू यांनी अपहार केला आहे. त्यांच्या चौकशीला परवानगी द्यावी, अशी मागणी ॲड. आंबेडकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यिारी यांची भेट घेऊन केली होती. त्यानंतर राज्यमंत्री कडू यांनी आंबेडकरांना उत्तर दिले आहे.

Prakash Ambedkar-Bachchu Kadu
राष्ट्रवादीत इनकमिंग जोरात; भाजपच्या निवडणूक सूत्रधाराचा प्रवेश, नगराध्यक्षांचे पतीही संपर्कात

बच्चू कडू म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी असा आरोप केला आहे की बच्चू कडू यांनी रस्त्याच्या निधीचा अपहार केला आहे. पण, तसे काही नाही. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या. त्यांनी आरोप करून अपेक्षाभंग केला आहे. मी त्यांना दोन ते तीन वेळा फोनही केला होता. मी त्यांना भेटायला गेलो होतो. मात्र, ते भेटले नाहीत. मी त्यांना परत भेटायला जाणार आहे.

Prakash Ambedkar-Bachchu Kadu
राष्ट्रवादीचे आमदार मानेंना आपल्याच शब्दाचा विसर; दीड वर्षानंतरही विजेचा प्रश्न कायम

अकोला जिल्हा परिषदेने पीसीआय १, पीसीआय २, ३, ४ असे करायला पाहिजे होते. मागच्या काळात ते अकोला जिल्हा परिषदेने केले नाही. अकोला जिल्हा परिषद आपल्याच पक्षाच्या ताब्यात असतानाही ग्रामीण रस्त्यांना प्राधान्य देणे आवश्यक होते. ते आपण केले नाही. त्यामुळे काही लोकप्रतिनिधींकडून रस्त्याच्या काही मागण्या आल्या, त्यासाठी आपण त्यांना निधी उपलब्ध करून दिला. जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग काम करते. निधीचा अपहार करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे आंबेडकरांनी माझ्यावर जे काही आरोप केले आहेत, ते अभ्यासपूर्ण नाहीत, असा दावाही बच्चू कडू यांनी केला आहे.

Prakash Ambedkar-Bachchu Kadu
राष्ट्रवादीच्या गटनेत्याचे थेट भरणेंनाच आव्हान; तर शहा कुटुंबाची पाटलांवर नाराजी कायम!

काय आहेत बच्चू कडूंवर आरोप...?

अकोला जिल्हा नियोजन समितीने ठरवून दिलेल्या रस्त्यांच्या कामात फेरफार करत भ्रष्टाचार केल्याचा कडू यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांच्यावरही आरोप केले गेले आहेत. शासनमान्य क्रमांक नसलेल्या रस्त्यांच्या कामांची यादी कडू यांनी जिल्हा परिषदेला पाठवली. या संदर्भातील पुरावे आणि माहिती वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी प्रशासनाला दिली आहे.

Prakash Ambedkar-Bachchu Kadu
जयंत पाटलांच्या अजितदादा, वळसे पाटलांसह हसन मुश्रीफांना कानपिचक्या!

पुंडकर यांनी याबाबत तक्रार करण्यासाठी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. पण, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनाही निवेदन देण्यात आले. अखेर कलम १५६/३ अंतर्गत जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. कडू यांनी बनावट दस्तऐवज बनवून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर शासकीय निधी वळता करून केलेल्या भ्रष्टाचारावर न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत. याबाबतची माहिती प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांना सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com