Bachchu Kadu News: नवनीत राणा-ठाकूर यांच्यातल्या वादाला 'कडू' फोडणी; म्हणाले, "पैसे देणारा-घेणारा..."

Bachchu Kadu Statement On Rana-Thakur Dispute : रवी राणा यांच्याकडून कडक नोटा घेतल्याचा आरोपाने खळबळ...
Bachchu Kadu On Rana-Thakur Dispute
Bachchu Kadu On Rana-Thakur Dispute Sarkarnama

Amravati Political News: खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरूद्ध काँग्रेसच्या आमदार व माजी मंत्री यशोमती यांनी ठाकूर आक्रमक पवित्रा घेतला आहे. नवनीत राणा यांच्याविरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले आहे. त्यामुळे हा वाद आता विकोपाला गेला आहे. दरम्यान या वादात आता आमदार बच्चू कडू यांनी उडी घेत यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

या वादावर आमदार कडू म्हणाले, "खासदार नवनीत राणा यांनी जे काही विधान केले आहे, त्यासंबंधी आम्ही पत्र देणार आहोत. पैसे देणे आणि पैसे घेणे चुकीचेच आहे, असं त्यांनी स्वत: म्हटलं आहे. याबाबत चौकशी झाली पाहिजे, सत्य काय आहे ते समोर आले पाहिजे," असं बच्चू कडू म्हणाले.

"यशोमती ठाकूर जे म्हणतात ते योग्य आहे. स्वत:च उमेदवारच दावा करतोय की, आम्ही पैसे दिले. मग यामध्ये पहिला दोषी कोण, यापेक्षा पैसे देणारा आणि घेणारा तेवढाच दोषी आहे. याची आता चौकशी झाली पाहिजे, " असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

राणांचा आरोप काय ?

लोकसभा निवडणूक काळात आपल्याकडून पैसे घेत दुसऱ्याचा प्रचार केल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर केला. यशोमती ठाकूर लोकसभा निवडणुकीत आमचा प्रचार करण्यासाठी रवी राणा यांच्याकडून कडक नोटा घेतल्याचा आरोप राणांनी केला होता.

(Edited By - Chetan Zadpe)

Bachchu Kadu On Rana-Thakur Dispute
Parliament Special Session: मोदी सरकारने का बोलावले विशेष अधिवेशन ? अधिवेशनाचा अजेंडा आला समोर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com