Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray's situation : स्वार्थासाठी तयार झालेले हे सरकार नाही, तर राज्याच्या विकासावर तिन्ही पक्षांचे एकमत झाले आणि हे सरकार अस्तित्वात आले. त्यामुळे कुणीही नाराज नाही की, अस्वस्थ नाही. सर्वच्या सर्व २६ मंत्री योग्य पद्धतीने काम करतील आणि सर्व आमदारांचे त्यांना सहकार्य असेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. (Fadnavis made important statements)
आज (ता. १४) नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते. आधीच शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता होती आणि आज खातेवाटप झाल्यानंतर अस्वस्थता वाढली का, असे विचारले असता, असे काहीही झालेले नसल्याचे बावनकुळे म्हणाले. उद्धव ठाकरे कोणत्या मानसिकतेत बोलतात, हे कळत नाही. देवेंद्र फडणवीसांनी काल (ता. १३) भिवंडीच्या बैठकीत रामायण, महाभारताचे जे दाखले दिले, ते कुणाला उद्देशून दिले नाही, हे त्यांना आधीच स्पष्ट केले होते, असे ते म्हणाले.
कुणी धोका दिला असेल, तर त्याला आपल्याला त्यांना त्यांची जागा दाखवावी लागते. अशी महत्त्वपूर्ण विधाने फडणवीसांनी केली आणि त्यामध्ये सत्यता आहे. २०१९ मध्ये फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा जनतेचा कौल होता, तो ठाकरेंनी धुडकावला आणि अनैसर्गिक आघाडी केली होती. त्याची फळे त्यांना आता मिळत आहेत.
नैसर्गिक युती शिवसेनेसोबत आहे. राष्ट्रवादीसोबत राजकीय युती आहे. त्यावेळी ठाकरेंनी बेईमानी केली. राजकारण तुम्ही जे त्यावेळी स्वीकारलं त्यापेक्षाही महत्वाचं आहे की ज्यांना तुम्ही सोडलं, ते आमच्याकडे आले आणि सरकार बनले.
भाजपची अपेक्षापूर्ती अजित करतील का, या प्रश्नावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तिघेही मिळून अर्थसंकल्प तयार करतील. युतीचे सरकार असते तेव्हा विचारविनिमय करून राज्याच्या जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प मांडला जातो, असे बावनकुळे यांनी सांगितले.
पाकिस्तानने फतवा जारी केला होता की, सरकार बनू शकत नाही. ते चॅलेंज भाजपने स्वीकारले. पाकिस्तानला थेट इशारा द्यायचा होता. त्यामुळे सरकार बसवले. त्यांच्या इशाऱ्यामुळे मेहबुबा मुफ्तीसोबत सरकार बनवावे लागले होते. असे ते म्हणाले. राज ठाकरेच्या वक्तव्याबाबत विचारले असता, त्यांच्या निर्णयावर मी काय बोलणार. त्यांच्या पक्षाची भूमिका, विचार ते मांडतील. त्यामध्ये मी काही बोलणार नाही, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांना २४ तास फडणवीस दिसतात. पद गेल्यावर त्यांना स्वप्नात मुख्यमंत्र्याची खुर्ची दिसते. त्यांनी स्वप्नातून बाहेर निघाले पाहिजे. २०१९ला फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये, म्हणून महाभारतातल्या अभिमन्यूसारखं त्यांना घेरण्यात आलं होतं. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी ते चक्रव्यूह रचले होते, मोठे षड्यंत्र रचले होते.
आज ठाकरेंसोबतही (Uddhav Thackeray) तेच झाले, असा घणाघात आमदार बावनकुळेंनी केला. ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील की नाही माहिती नाही. कारण त्यांच्या नेतृत्वाला लोक सोडून गेले. हजारो शिवसैनिक (Shivsainik) गेले, आमदार गेले. जो आपलं घर सांभाळू शकत नाही, तो मोठा होऊ शकत नाही. ते आता नैराश्याच्या गर्तेत गटांगळ्या खात आहेत, असेही बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.