Bawankule on Sharad Pawar : बावनकुळेंना अजूनही वाटतं की, शरद पवारांचे मनपरिवर्तन होईल, कारण...

Maharashtra Government : ज्यांचं सरकार असतं, त्यांच्या बाजूने निर्णय होत असतात.
Sharad Pawar and Chandrashekhar Bawankule
Sharad Pawar and Chandrashekhar Bawankulesarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News : आम्ही मूर्ख आहोत, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. पण तरीही अजित पवारांचे जसे मनपरिवर्तन झाले, तसेच शरद पवारांचेही होईल, असं मला आजही वाटतं. कारण सहा ते सात वेळा असे प्रसंग आले की ‘तुम्ही भाजपसोबत सलगी करा’, असं सांगितल्या गेल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. त्यामुळे पवारांचे मनपरिवर्तन होण्यास वाव असल्याचा पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. (What did you do differently during your Mahavikas Aghadi government?)

आज (ता. २८) सकाळी नागपुरात पत्रकारांशी आमदार बावनकुळेंनी संवाद साधला. ते म्हणाले, अजित पवार आमचे नेते आहे, असं जेव्हा शरद पवार म्हणतात, त्यांचं कौतुक करतात. तसेच त्यांचे पारिवारिक जे काही संबंध आहेत त्यामुळे त्यांचे मन आणि मतपरिवर्तन होईल. निधी वाटपाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, ज्यांचं सरकार असतं, त्यांच्या बाजूने निर्णय होत असतात. तुमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना तुम्ही तरी काय वेगळं केलं?

ज्याचं सरकार असतं त्यांच्या बाजूने जरा झुकतं माप असतच. लिखित व अलिखित असे दोन्ही निर्णय झाले की भाजपच्या आमदारांना शून्य ठेवायचं आणि भाजपच्या आमदारांना अडीच वर्ष एकही पैसा दिला गेला नाही. अपक्ष आमदारांनाही पैसा दिला नाही. पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, असा विचार करत नाही. विरोधी पक्षाच्या सदस्यांनाही ते निधी देतीलच आणि अजित पवारही त्या बाबतीत सकारात्मक विचार करतील.

बिडच्या सभेतून लोक निघून गेले, याबाबत विचारले असता, कोणत्याही सभेला उशीर होतो तेव्हा दूरवरून येणारे लोक घरी जाण्याची घाई करतातच. दुपारी तीन वाजता आलेले लोक रात्री नऊ वाजेपर्यंत कसे थांबतील? हे सगळ्यात सभांमध्ये होत असतं, याचा अर्थ असा नाही की ते कंटाळून चालले गेले.

Sharad Pawar and Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule News : भाग पाडलं तर कायदा हातात घेऊ, अन् मुंबईत 'ईट का जवाब पत्थर से...' देऊ !

या देशात निवडणूक आयोग स्वतंत्र व निष्पक्ष आहे. त्यांच्याकडे लोकप्रतिनिधी जास्त असल्याने प्रफुल्ल पटेल यांचे मत असेल. प्रफुल्ल पटेल यांनी जे सबमिशन केलं, त्याचे त्यांच्याकडे पुरावे असतील. त्यामुळे त्यांना वाटलं असेल. एकनाथ शिंदे यांच्यासोबतही असंच झालं. त्यांच्याकडे जास्त लोकप्रतिनिधी होते म्हणून त्यांना धनुष्यबाण मिळालं. पण शरद पवार ज्याप्रमाणे सांगतात की लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नसतो, संघटना म्हणजे पक्ष असतो, ते मला पटण्यासारखं नाहीये.

२०२४ पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत. २०२४ मध्ये निवडणुकांचा जो काही निकाल येईल, त्यावर आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल आणि अजित पवार व एकनाथ शिंदे यांचा समन्वय होईल. ‘सामना’मध्ये डायरेक्टर, प्रोड्यूसर, कलावंत तेच आहेत. असं असलं तरीही अजित दादांसारख्या चांगल्या नेतृत्वावर ‘सामना’तून टीका करणे योग्य नाही, असे म्हणत बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला.

Sharad Pawar and Chandrashekhar Bawankule
Bawankule On Sanjay Raut: ठाकरेंचे भरकटलेले 'यान' काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल; बावनकुळेंचा राऊतांना चिमटा

उद्धव ठाकरेंनी विमान चालवण्याची जबाबदारी संजय राऊतांना दिली आहे आणि पायलटच्या मनात आलं, की विमान पाडायचं आहे. मग प्रवाशांना कोण वाचवणार? म्हणून प्रवासी दुसरीकडे जाणारच आहेत. म्हणून उद्धव ठाकरेंनी पायलटचं काम जेव्हा संजय राऊतांकडे दिलं, त्याच दिवशी प्रवासी उतरून गेले आणि आता जेव्हा दुसरीकडे या विमानाचं लँडिंग होईल, तेव्हा दुसरे प्रवासी दिसणारच नाहीत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतच राहतील. दुसरे कोणी राहणारच नाही, असे म्हणत त्यांनी संजय राऊतांवरदेखील टिका केली.

नरेंद्र मोदी यांच्या कामाचं जे लोक कौतुक करतात त्यांच्या बाजूने अजित दादांनी येऊन चांगला निर्णय घेतला आहे, असं मला वाटतं. अजित दादांनी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयापेक्षा सर्वाधिक चांगला निर्णय म्हणजे ते मोदींसोबत आले. हा निर्णय त्यांच्या जीवनातील सगळ्यात चांगला निर्णय आहे. शेवटी भविष्यात ते मुख्यमंत्री होणार की नाही, सांगता येत नाही. याची भविष्यवाणी करता येत नाही.

Sharad Pawar and Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Reply : 'सामना'ची आग विझवावी लागेल...; बावनकुळेंचा ठाकरेंना इशारा

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि अजित पवार (Ajit Pawar) तेथील रहिवासी. त्यामुळे एखादी बैठक त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत घेतली, तर त्यात काही गैर नाही. याबद्दल चंद्रकांत पाटील यांनाही काही आपत्ती नाही. ते अजूनही काहीच बोलले नाहीत. त्यामुळे तेथे काही समस्या असल्याचे वाटत नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com