Anil Deshmukh On Bawankule : बावनकुळेंनी पदाला शोभेल, असे बोलावे; पवारांची उंची त्यांना नाही कळणार !

Sharad Pawar : शरद पवारांना शिकवण्याइतके ते निश्‍चितच मोठे नाहीत.
Chandrashekhar Bawankule and Anil Deshmukh
Chandrashekhar Bawankule and Anil DeshmukhSarkarnama

Nagpur Political News : माजी मंत्री व आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे मोठ्या राजकीय पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्या पदाला शोभेल, असेच वक्तव्य त्यांनी करणे अपेक्षित आहेत. शरद पवारांना शिकवण्याइतके ते निश्‍चितच मोठे नाहीत आणि पवारांची उंची त्यांना करणार नाहीच, असे म्हणत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बावनकुळेंवर पलटवार केला. (Anil Deshmukh counter-attacked to Bawankule)

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. तेव्हापासून दोन्ही गटांतील नेते एकमेकांवर कुरघोड्या करायला लागले. पण यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे दोन्ही गटांतील नेते शरद पवारांना दैवत मानतात. पण अजित पवार गटातील नेते शरद पवारांचे ऐकत नाहीत.

विनापरवानगी माझा फोटो कुणीही, कुठेही वापरू नये, असे आदेश शरद पवारांनी दिले होते. पण त्यांचा हा आदेश अजित पवार गटातील लोकांना अद्यापही मानला नाही. पवार साहेब आमचे दैवत आहे, असे म्हणत ते सर्रास पवारांचा फोटो बॅनर्सवर लावतात. त्यावरून दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये हमरीतुमरीही झाली आहे. सद्यःस्थितीत शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सभांचा मुकाबला सुरू झाला आहे.

अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार शरद पवारांना दैवत मानतात आणि त्यांचे फोटो कार्यक्रम मेळाव्यांमध्ये वापरतात. अशा आमदारांच्या मतदारसंघात शरद पवारांनी सभा घेऊन आपली उंची कमी करून घेऊ नये, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांवर टिका केली होती. त्यांच्या या टीकेला आमदार अनिल देशमुख यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

Chandrashekhar Bawankule and Anil Deshmukh
Anil Deshmukh News: ‘समझोता करणार नाही’, असे म्हटल्यावर दुसऱ्याच दिवशी माझ्यावर धाड पडली !

शरद पवारांची (Sharad Pawar) उंची फार मोठी आहे. बावनकुळेंना (Chandrashekhar Bawankule) ती मोजताही येणार नाही. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना बावनकुळेंनी अक्कल शिकवू नये. ते ज्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यानुसार असे वक्तव्य करणे त्यांना शोभणार नाही. त्यामुळे आपल्या पदाला शोभेल, असेच बावनकुळे यांनी बोलले पाहिजे, असे म्हणत अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com