Chandrashekhar Bawankule News: बावनकुळे म्हणाले; एकनाथ शिंदेंनी दिलेला व्हीप मानावा लागेल, अन्यथा...

विरोधकांची हिंमत नाही सरकारला घेरण्याची.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: विरोधकाची भूमिका पार पाडण्यासाठी ते बोलत असतात. ते त्यांचे कामच आहे. परंतु त्यांच्या काळामध्ये त्यांनी महाराष्ट्र मागे नेला. आता त्यांच्याकडे बोलायला काही नाही. त्यामुळे उठसूठ आरोप करायला लागतात, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, विरोधक या सरकारला घेरू शकत नाही, कारण हे डबल इंजीन सरकार आहे आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत आहे, म्हणून विरोधकांची हिंमत नाही सरकारला घेरण्याची. मनिष सिसोदिया यांच्यावर झालेल्या कारवाईसंदर्भात विचारले असता, जेव्हा जेव्हा विरोधकांवर कारवाई होते आणि त्यांनी केलेलं पाप केंद्रीय यंत्रणा तपासून काढते, तेव्हा ते असं बोलत राहतात, असे बावनकुळे म्हणाले.

केंद्रीय तपास यंत्रणांना वाटलं तर ते कुणाचीही चौकशी करू शकतात. चौकशीत त्यांना काही पुरावे मिळाले असतील म्हणून कारवाई झाली असेल, विरोधी पक्षाचे कामच आहे एजन्सीला विरोध करायचा. आतापर्यंत त्यांनी तेच केले आहे. कुठल्याही तपास यंत्रणा नियमांच्या बाहेर किंवा पुराव्याच्या बाहेर जात नाही. त्यामुळे ज्याची कुणाची चौकशी सुरू झाली, त्यांनी फालतू विरोध करू नये, तर चौकशीला सामोरे जावे आणि तपास यंत्रणेला सहकार्य करावे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटातील लोकांना व्हीप बजावण्याची तयारी चालवली आहे. याबाबत विचारले असता, ठाकरे गटाने काय म्हणायचं ते म्हणू द्या, निवडणूक आयोगाने शिंदेंना धनुष्यबाण हे चिन्हे दिले आहे. ते धनुष्यबाणावर निवडून आले आहेत. त्यांच्या बी फार्मवरसुद्धा शिवसेना आहे, धनुष्यबाण आहे. त्यामुळे यांनी दिलेला व्हीप मानावा लागेल, नाही तर नियमाप्रमाणे जी कारवाई व्हायची ती होईल, असे आमदार बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule
Bawankule : असत्य बोलून राजकारण करणारे फडणवीस नाहीत, पवारांच्या प्रतिक्रियेवर बोलले बावनकुळे !

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) घेतील. मंत्रिमंडळ विस्ताराची गरज आहे आणि ते योग्य तो निर्णय घेतील. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने सरकारचा निर्णय असेल. त्यामुळे त्यावर फार चर्चा करण्याची गरज नाही. योग्य वेळेची प्रतीक्षा करावी लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com