Nana Patole : नाना पटोलेंची उरलीसुरली आशाही मावळली, भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एक मोठा धक्का

Bhandara Bank Election : भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पॅनेलचा धुव्वा उडाला होता. आता त्यांची उरलीसुरली आशाही मावळली आहे. कोर्टाच्या आदेशाने 6 संचालकांची मतमोजणी राखून ठेवण्यात आली होती.
Nana Patoleww
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Bhandara News, 01 Aug : भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पॅनेलचा धुव्वा उडाला होता. आता त्यांची उरलीसुरली आशाही मावळली आहे. कोर्टाच्या आदेशाने 6 संचालकांची मतमोजणी राखून ठेवण्यात आली होती.

यावरील स्थगिती हटताच झालेल्या मतमोजणी सर्व 6 संचालक भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना महायुतीचे निवडून आले आहेत. महाविकास आघाडीला 21 पैकी फक्त 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक नाना पटोले यांनी प्रतिष्ठेची केली होती.

भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांनीसुद्धा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला. बँकेचे माजी अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या विरोधात खासदार प्रशांत पडोळे यांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली होती. खासदार स्वतःच बँकेच्या निवडणुकीत उतरल्याने सर्वांचे लक्ष या लढतीत लागले होते.

Nana Patoleww
Prakash Ambedkar : '...तर RSS अन् कोणत्याही ब्राम्हणाला दोषी ठरवले जाणार नाही', प्रकाश आंबेडकरांचा 'मालेगाव' निकालावर गंभीर सवाल

मात्र, फुंडे यांनी खासदारांना पराभवाचा धक्का दिला. सुरुवातीला त्यांनी आपण बँकेची निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्जसुद्धा दाखल केला होता. मात्र गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक आणि त्यानंतर भंडारा दूध संघात त्यांच्या पॅनेलचा झालेला पराभव बघून त्यांनी आधीच उमेदवारी मागे घेतली होती.

दूध संघाच्या निवडणुकीत भंडाराचे शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पटोले यांच्यासोबत हातमिळवणी केली होती. यावरून महायुतीमध्ये मोठे मतभेद उफाळून आले होते. भंडारा बँकेच्या निवडणुकीत भोंडेकर यांनी आपली चूक सुधारली. ते पुन्हा महायुतीत परतले. त्यामुळे महायुतीच्या पॅनेलच्या उमेदवारांची ताकद आणखी वाढली होती. याशिवाय मत विभाजनाचाही धोका टळला होता.

Nana Patoleww
Kokate portfolio change: मकरंदआबांचा नकार तर भरणेमामांचा होकार; कोकाटेंचे खाते बदलताना पडद्यामागे काय घडले?

भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 41 उमेदवारांना दावेदारी दाखल केली होती. रविवारी संचालकपदासाठी मतदान घेण्यात आले होते. 1062 मतदारांनी शंभर टक्के मतदानाचा हक्क बजावला होता. भंडारा बँकेची निवडणूक महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, भाजपचे आमदार परिणय फुके, शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात लढवली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com