
Bhandara DCC Bank : भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दिग्गज नेत्यांनी उडी घेतली आहे. त्यातही काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती झाली आहे. तर दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे. भाजपने केंद्रात प्रथमच स्वतंत्र सहकार खाते निर्माण केले आहे. तेव्हापासून भाजप सहकार क्षेत्राच्या निवडणुकीत उतरणे सुरू केले आहे. त्यामुळे या निवडणुकीला राजकीय रंग आला आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, आमदार नाना पटोले आणि भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या युतीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आधीपासूनच खडाजंगीला सुरुवात झाली आहे. पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी यापूर्वीच एकमेकांवर तोफ डागल्या आहेत. दुसरीकडे आमदार भोंडेकर आणि भाजपचे आमदार परिणय फुके यांचे एकमेकांवर शाब्दिक वार सुरू आहेत.
आज (शुक्रवारी) बँकेचा निवडणूक अर्ज दाखल करणयाचा शेवटचा दिवस होता. सकाळी बँकेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक सुनील फुंडे यांच्या विरोधात भंडारा-गोंदियाचे काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांनी दावेदारी दाखल केली आहे. नाना पटोले यांनी यापूर्वीच अर्ज दाखल केला आहे. भोंडेकर स्वतः निवडणुकीत उतरले नसले तरी ते पटोले यांच्या पॅनेलमध्ये आहेत. याशिवाय भाजप-राष्ट्रवादीतून राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी उमेदवारी दाखल केली आहे. या युतीसोबत माजी मंत्री विलासराव शृंगार पवार, माजी राज्य मंत्री नानाभाऊ पंचबुधे, माजी हातमाग मंत्री धनंजय दलाल हे आहेत.
भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 1300 मतदार असून सुमारे 2 हजार कोटींचा टर्नओव्हर आहे. बँकेच्या एकूण 43 शाखा आहेत. 21 संचालकांना बँकेवर निवडून द्यायचे आहे. 28 जुलैला मतदान आणि 29 जुलैला मतमोजणी होणार आहे. यापूर्वी भंडारा बँकेच्या तीन निवडणुका बिनविरोध झाल्या. तब्बल 14 वर्षानंतर प्रत्यक्ष निवडणूक होऊ घातली आहे. यात आता सर्वच पक्षाचे दिग्गज नेते उतरले आहेत. त्यामुळे भंडारा येथे बँकेच्या निवडणुकीपेक्षा नेत्यांच्या राजकीय वजनाचीच अधिक चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.