Nana Patole alliance: : भंडाऱ्यात मोठी राजकीय उलथापालथ; काँग्रेसच्या नाना पटोलेंचा उलटा गेम शिंदेंच्या आमदारासोबत युती

Bhandara political News : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिवसेनेतील बंडावेळी एकनाथ शिंदेंची साथ देणाऱ्या शिवसेनेच्या आमदारासोबत युती केली आहे.
Nana Patole & Eknath Shinde
Nana Patole & Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Bhandara News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या घोषणेपुर्वीच रण तापण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात काही ठिकाणी नेतेमंडळी त्यांच्या सोयीनुसार हातमिळवणी करताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भंडारा जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. या ठिकाणी होत असलेल्या दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिवसेनेतील बंडावेळी एकनाथ शिंदेंची साथ देणाऱ्या शिवसेनेच्या आमदारासोबत युती केली आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते आणि भाजप आमदार एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता, भंडारा जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड घडली असून दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार शिवसेनेचे पूर्व विदर्भ समन्वयक आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासोबत एकत्र निवडणूक लढणार आहेत. भंडाऱ्यातील या अनोख्या युतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Nana Patole & Eknath Shinde
Shivsena News: भाजप अन् काँग्रेस महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याचे संकेत, ठाकरेंच्या मनात काय..?

काँग्रेसचे (Congress) माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दूध संघाच्या निवडणुकीसाठी येवती करण्याचा निर्णय घेतला आहे. भंडारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात घडलेली ही राजकीय घडामोड सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. येत्या काळात दोन दिग्गज नेते एकत्र आले आहेत. त्यामुळे भंडारा येथील दूध संघाच्या निवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nana Patole & Eknath Shinde
Uddhav Thackeray strategy : सत्ता गेली, साथीदार गेले पण ‘हे’ नेते ठरणार मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे गटाचे ब्रह्मास्त्र!

दूध संघाची ही निवडणूक झाल्यानंतर बँकेच्या निवडणुकीसाठी आम्ही पुन्हा एकत्र बसू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आमचे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी हे सांगतील त्यानुसार होईल, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले. नरेंद्र भोंडेकर शिवसेनेचे (Shivsena) असले तरी या जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही दोघेही मिळून काम करत आहोत. या निवडणुकीला राजकीय वळण न देता जिल्ह्याच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ही निवडणूक असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

Nana Patole & Eknath Shinde
Raj Thackeray On Kundmala Bridge : कुंडमळा दुर्घटनेनंतर राज ठाकरे सरकारवर बरसले, 'निष्काळजी...'

भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही सर्व नेतेमंडळी एकत्र आलो आहोत. भंडारा जिल्ह्यातील सहकार महर्षींनी जिल्ह्याला चौपाट केले आहे. जिल्हा दूध संघ त्यांच्यामुळे डबघाईस आला आहे. त्याच्याविरोधात ही लढाई आहे. सर्वसामान्य माणूस, दूध उत्पादक शेतकरी यांना उभे करण्यासाठी ही सहकारातील युती आहे, असे नरेंद्र भोंडेकर यांनी स्पष्ट केले.

Nana Patole & Eknath Shinde
Raj Thackeray, Fadnavis : चोरी... चोरी.. चुपके...चुपके... कोण कोणाला भेटले? यावरून दोन बड्या नेत्यांमध्येच पेटले !

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com