Maratha Reservation News : "...म्हणून मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज !" ; 'या' नेत्याचं मोठं विधान

Beed Politics : '' महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य...''
Manoj Jarange Maratha Reservation
Manoj Jarange Maratha Reservation Sarkarnama
Published on
Updated on

Beed : आजवर सर्व जाती- धर्मांना सोबत घेऊन आलेल्या मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती अलिकडे अत्यंत वाईट आहे. समाजाच्या उपजीविकेचे शेतजमीन एकमेव साधन आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे हे क्षेत्र देखील उध्वस्त होण्याची वेळ आली आहे. आत्महत्या करणारे बहुतांशी शेतकरी देखील दुर्दैवाने मराठा समाजातीलच आहे. खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे सामर्थ्य ईश्वराने राज्यकर्त्यांना द्यावे, असे मत माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांनी व्यक्त केले.

मराठा समाजातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक माजीमंत्री शिवाजीराव पंडित (Shivajirao Pandit) यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी छत्रपती संकुल येथे झाली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथील सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय यावेळी करण्यात आला.

Manoj Jarange Maratha Reservation
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार ? सांगलीत झळकले 'मराठा आरक्षण नाही तर मतदान नाही'चे बॅनर

शिवाजीराव पंडित म्हणाले, महाराष्ट्र(Maharashtra) हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे, महाराष्ट्राने सर्वप्रथम मंडल आयोग लागू केला. सर्व जाती- धर्माला सोबत घेवून चालण्याचे काम मराठा समाजाने आजवर केले. इतरांच्या आरक्षणात आम्हाला हिस्सा नको आहे, कोणाच्याही भावना न दुखवता मोठा भाऊ म्हणून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आम्ही करत असल्याचे पंडित म्हणाले.

आजवरच्या सर्व आंदोलनात मी स्वत: सहभागी झालेलो आहे. मराठा(Maratha Reservation) समाजाची परिस्थिती दिवसेंदिवस भयानक होत आहे. शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण नसल्यामुळे समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. यासाठी खऱ्या अर्थाने समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

"मराठा आरक्षण नाही तर मतदान नाही..."

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजाने 58 मूक मोर्चे काढले. त्यानंतर नुकतेच मनोज जरांगे पाटील यांनी जालना येथे आरक्षणाच्या मागणीसाठी तब्बल सतरा दिवस आमरण उपोषण केले. जरांगे पाटलांनी राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. त्यातच पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने हे आंदोलन चिघळले होते. त्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटले होते.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाचे आंदोलन अद्यापही ठिकठिकाणी सुरूच आहे. असे असतानाच आता सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडगमध्ये थेट मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. "मराठा आरक्षण नाही तर मतदान नाही", असे बॅनरच गावाच्या वेशीवर झळकवण्यात आले आहे. या बॅनरची आता राज्याच चांगलीच चर्चा रंगली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Manoj Jarange Maratha Reservation
Maharashtra Politics : मुंबईत पोचताच शिवसेना आमदार अपात्रतेबाबत नार्वेकरांनी केले मोठे विधान...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com