Bhandara Politics News : भोंडेकरांना याही वेळी मंत्रिपद देणार हुलकावणी!, ‘हे’ आहे कारण...

Narendra Bhondekar : जिल्ह्याचे पालकमंत्रिपद जिल्ह्यातील कार्यकर्त्यालाच मिळायला पाहिजे.
Narendra Bhondekar
Narendra BhondekarSarkarnama

Bhandara District Guardian Minister News : भंडारा - शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी, म्हणून अनेक इच्छुक कामाला लागले आहेत. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्रिपद जिल्ह्यातील कार्यकर्त्यालाच मिळायला पाहिजे, असा सणसणीत इशारा शिंदे समर्थक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिलेला आहे. (Narendra Bhondekar has warned the Shinde-Fadnavis government)

महाविकास आघाडी सरकारच्या वेळी भोंडेकरांची महामंडळावर वर्णी लागणार म्हणून जिल्ह्यात चर्चा होती. जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही. आमदार भोंडेकर हे शिंदे समर्थक आहेत. म्हणूनच भोंडेकरांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार, असे शिवसेना कार्यकर्त्यांना वाटत आहे. मात्र, भोंडेकरांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार की महामंडळावर बोळवण केली जाणार, या चर्चेला जिल्ह्यात चांगलेच उधाण आले आहे.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. १९ मंत्र्यांनी कारभार सांभाळल्यानंतर विस्ताराला मुहूर्त काही मिळाला नाही. मात्र, आता शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार हा छोटेखानी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अंदाजे १० किंवा १४ आमदारांना मंत्रिपद मिळू शकते. सत्ताधारी पक्षाच्या नेतेमंडळींमध्ये रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराजी असल्याची चर्चा आहे. तसेच याच मुद्द्यांवरुन विरोधकांकडून देखील सातत्याने या सरकारवर टीका केली जात आहे. त्यामुळे शिंदे गटातील व भाजपमधील अनेक इच्छुकांची मनधरणी करण्यासाठी त्यांची महामंडळावर बोळवण केली जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Narendra Bhondekar
Bhandara District News : भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील कट्टर विरोधक दादा-भाऊ एकाच मंचावर, ‘हे’ आहे कारण...

निवडणुका नजरेसमोर ठेवून विस्तार..

भाजपच्या महाराष्ट्रातल्या ‘मिशन ४५’ लाभदायक ठरू शकतील, अशा नेत्यांचीच मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यातच भोंडेकर ज्या विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात तो विधानसभा मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात येतो. महत्वाचे म्हणजे भंडारा गोंदिया लोकसभा भाजपच्या कोट्यात येत असल्याने भोंडेकरांना मंत्रिपद मिळणे सहजासहजी शक्य नसल्याची चर्चा भाजपच्या गोटात आहे.

गेल्या वर्षभरापासून शिंदे-फडणवीसांसह मंत्रिमंडळातील त्यांचे १९ सहकारी राज्याचा कारभार चालवत आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा हा विस्तार आगामी लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून करण्यात येईल, असे जिल्ह्यातील राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

Narendra Bhondekar
Bhandara Bazar Samiti: भाजपचा पुन्हा काँग्रेसच्या गडाला सुरुंग; उमेदवार फोडून बाजार समितीवर भाजप-शिवसेना- राष्ट्रवादीची सत्ता

जिल्ह्याचा मंत्री असला तर जिल्ह्याचा विकास..

जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर, जिल्ह्याचा पालकमंत्री असायला हवा. मला जर मंत्रिपद देत नसाल तर, भाजप (BJP) किंवा शिवसेनेच्या (Shivsena) एखाद्या कार्यकर्त्याला मंत्रिपद द्या. अन्य जिल्ह्याला ज्या पद्धतीने स्थानिक पालकमंत्री देता, त्या पद्धतीने भंडारा (Bhandara) जिल्ह्यालाही मिळायला हवा, असे वक्तव्य आमदार भोंडेकरांना काल केले. त्यामुळे आधीच्या सरकारच्या काळात बाहेरच्या जिल्ह्याचा आमदार पालकमंत्री झाला तेव्हा विकास झाला नाही काय, असा खोचक प्रश्‍न विरोधी पक्षातील नेते विचारत आहेत.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com