Bhandara Politics : भाजपला डावलून शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेसच्या नाना पटोलेंशी युती

Bhandara Shivsena alliance With Nana Patole : महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी आणि युती होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यापूर्वीच सहकार क्षेत्राच्या निवडणुकीत आघाडी आणि युती बाजूला ठेवून नेत्यांचे राजकारण सुरू आहे.
Nana Patole-Eknath shinde
Nana Patole-Eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 17 Jun : महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी आणि युती होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यापूर्वीच सहकार क्षेत्राच्या निवडणुकीत आघाडी आणि युती बाजूला ठेवून नेत्यांचे राजकारण सुरू आहे.

भंडारा जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि कट्टर विरोधक व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकमेकांसोबत युती केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र आमदार भोंडेकर यांनी मात्र सहकार क्षेत्रात हे सर्व चालते.

या निवडणुकांमध्ये पक्ष बघितला जात नाही. पक्षाचे चिन्हसुद्धा नसते. त्यामुळे याचा बाऊ करण्याची गरज नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. विशेष म्हणजे भाजपचे आमदार परिणय फुके यांनी यावर आक्षेप घेतला आहे. भोंडेकर महायुतीत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत जिंकूण आणण्यासाठी त्यांना आम्ही मदत केली. हे त्यांनी विसरू नये असा इशारा दिला आहे.

मात्र भोंडेकर यांनी नाना पटोले यांच्यासोबत सहकार क्षेत्राची निवडणूक असल्याने फुके यांच्या इशाऱ्याला फार काही महत्त्व दिले नाही. शिवसेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून पूर्व विदर्भात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. पूर्व विदर्भाचे संघटक किरण पांडव, राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि आमदार कृपाल तुमाने यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

Nana Patole-Eknath shinde
Nashik Politics : भाजपच्या आधीच शिंदेंनी डाव टाकला, ठाकरेंना धक्का देत चार माजी नगरसेवकांचा प्रवेश करुन घेतला

भोंडेकर यांच्या कार्यपद्धतीची तक्रार एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे. यावर बोलताना भोंडेकर म्हणाले, कोणी नाराज नाही. मी पक्ष मजबूत करण्याचे काम करत आहे. पूर्वी दोन जिल्हा प्रमुख असायचे आता आम्ही तीन केले आहेत. त्यामुळे पक्ष संघटना वाढत आहे. काही लोकांनी शिवसेना सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला.

मात्र जे गेले ते काही फार मोठे नेते नाही. त्यापेक्षा जास्त लोक शिवसेनेत आले असल्याचा दावा त्यांनी केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता आम्ही पक्ष संघटनेत बदल केले आहेत. त्यामुळे काही लोक नाराज होणे स्वाभाविक आहे.

Nana Patole-Eknath shinde
Kolhapur Political News : काँग्रेसला मोठं भगदाड, 35 जणांची यादी तयार, मुंबईत होणार पक्षप्रवेश

खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत नियमित बैठक होत असते. त्यांच्या कानावर सर्व घावण्यात आले आहे. संघटन स्तरावर नेहमीच बैठका होत असतात. त्याच सर्वच विषयाची चर्चा होते. कोणी नाराजी व्यक्त केली नसल्याचेही भोंडकर यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com