

Bhandara News : रोजगार सेवकांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली शेकडो रोजगार सेवकांनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा हा मोर्चा भंडारा पोलिस ठाण्याजवळ आक्रमक वळणावर पोहोचला. नाना पटोले आणि आमदार अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चेकरी थेट पोलिस ठाण्यात दाखल झाल्याने पोलिस प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली.
मोर्चातील मोठ्या संख्येने आंदोलक पोलिस ठाण्यात दाखल झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मोर्चाची पूर्वकल्पना असल्याने पोलिस प्रशासनाने बंदोबस्त वाढवला होता. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून नाना पटोले (Nana Patole) आणि आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते.
राज्य सरकारच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात यावा, अशी मागणी नाना पटोले आणि रोजगार सेवकांनी केली. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलिस ठाण्यातून उठणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यामुळे पोलिस प्रशासनासमोर परिस्थिती हाताळण्याचे आव्हान निर्माण झाले.
दरम्यान, ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत रोजगार सेवकांच्या मागण्यांचा मुद्दा या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहे. राज्य सरकारने 3 ऑक्टोबर 2024 रोजी ग्राम रोजगार सेवकांना 8 हजार रुपये मानधन आणि 2 हजार रुपये प्रवास भत्ता देण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप रोजगार सेवकांकडून करण्यात येत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबरोबरच रोजगार सेवकांवर लागू करण्यात आलेल्या कथित अन्यायकारक अध्यादेशाचा प्रश्नही आंदोलकांनी उपस्थित केला आहे. सरकारने आश्वासन देऊनही मागण्यांची पूर्तता केली नसल्याचा आरोप करत रोजगार सेवकांनी आंदोलन तीव्र केले आहे.
मोर्चेकरी मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वरिष्ठ अधिकारी नाना पटोले तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या युवकांशी चर्चा करत होते. रोजगार सेवकांच्या मागण्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनामुळे रोजगार सेवकांच्या मानधनाचा आणि प्रवास भत्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.
3 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी.
24 महिन्यांचे थकीत मानधन द्यावे.
मानधन आणि प्रवासभत्ता नियमित द्यावा.
रोजगार सेवकांना करणाऱ्या सरकार विरोधात 420चा गुन्हा दाखल करावा
सरकार विरोधात गुन्हा दाखल करणार नसल्यास आम्ही ठाण्यातून उठणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.