नानांच्या प्रेमातील वाघमारेंनी बावनकुळेंची विनंती धुडकावली... अखेर कठोर कारवाई

भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसचे (Congress) गंगाधर जिभकाटे तर उपाध्यक्षपदी भाजपच्या (BJP) फुटीर गटाचे संदीप टाले विजयी झाले आहेत.
Chandrasekhar Banavakule News
Chandrasekhar Banavakule Newssarkarnama
Published on
Updated on

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक आज (ता. १० मे) झाली. यामध्ये अध्यक्षपदी काँग्रेसचे (Congress) गंगाधर जिभकाटे तर उपाध्यक्षपदी भाजपच्या (BJP) फुटीर गटाचे संदीप टाले विजयी झाले आहेत. भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांचा एक गट भाजप पक्ष श्रेष्टींचा आदेश झुकारुन काँग्रेस सोबत गेल्यामुळे भाजपला सत्तेपासून दुर राहावे लागले. वाघमारे व पाच सदस्यांनी पक्ष आदेश मान्य केला नाही. त्यामुळे भाजप मधून वाघमारे यांना सहा वर्षाकरीता प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या आदेशानुसार निलंबीत करण्यात आले आहे.

सोबतच तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रातील पक्षाची कार्यकारिणी रद्द करण्यात आली असल्याचे माजी मंत्री चंद्रशेखर बावकुळे यांनी जाहीर केले. वाघमारे यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यात भाजपमध्ये गटबाजी आल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करु नये, असे चरण वाघमारे यांनी सांगितले होते. भाजप, राष्ट्रवादी एकत्र आली तर आपण वेगळा विचार करु, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतरही भाजपच्या एका गटाने राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. त्यामुळे वाघमारे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

Chandrasekhar Banavakule News
भाजप नेत्यानं मलिकांना आणलं अडचणीत! अखेर जामिनावर झाली सुटका

भाजपमधील गटबाजी शमविण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Banavakule) यांची नियुक्ती 'निरीक्षक' पदी करण्यात आली होती. चरण वाघमारे व विधानपरिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके (Parinay Phuke) यांच्या गटात चढाओढ निर्माण झाली होती. भाजपमधील अंतर्गत वाद पाहता पक्ष श्रेष्टींनी बावनकुळे यांच्याकडे जिल्ह्यातील सूत्रे दिली होती. बावनकुळे यांनी सूत्रे हाती घेताच वाघमारे यांना फोन केले. मात्र, त्यांनी भाजपने राष्ट्रवादीसोबत जाऊन नये असे स्पष्ट केल्यामुळे बावनकुळे यांना वाघमारे यांचे मन वळवण्यात यश आले नाही. परिनामी आज झालेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेससोबत जात उपाध्यक्षपद पदरात पाडून घेतले.

Chandrasekhar Banavakule News
राष्ट्रवादीने साथ सोडली; भाजपच्या मदतीने नाना पटोलेंनी बसवला काँग्रेसचा अध्यक्ष

वाघमारे यांच्या बंडखोर गटाचे ५ आणि १ अपक्ष अशा सदस्यांनी सर्वाधिक २१ सदस्य असलेल्या काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यांना बसपा १, शिवसेना १, वंचित १ आणि अपक्ष २ अशा सदस्यांची साथ मिळाली. तर भाजपमधील आमदार परिणय फुके आणि खासदार सुनिल मेंढे यांच्या ७ सदस्यांनी राष्ट्रवादीची साथ दिली. राष्ट्रवादीचे १३ सदस्य आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावे लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com