Gondia ZP : आजी-माजी आमदारांच्या कामांना अध्यक्षांची ‘कंडिशनल’ परवानगी

New Impasse : श्रेय घेताना होणार दोन्ही लोकप्रतिनिधींची अडचण
Gondia Zilla Parishad.
Gondia Zilla Parishad.Google
Published on
Updated on

Zilla Parisha Politics : गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी आजी-माजी आमदारांच्या विकासकामांना मंजुरी प्रदान करताना अटीशर्ती ठेवल्यानं या ‘कंडिशनल’ कामांचं श्रेय घेताला लोकप्रतिनिधींची कोंडी होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत रस्त्यांशी संबंधित हा विषय मंजूर करण्यात आला. पण त्यासाठी अध्यक्षांनी अटी ठेवल्या आहेत. (Gondia ZP President Pankaj Rahangdale Sanction Development Projects of Former & Existing MLAs on Conditional Basis)

Gondia Zilla Parishad.
Bhandara News : अपात्र ठरविलेल्या महिलेला प्रमाणपत्र देत शासन पोहोचले दारी

गुरुवारी (ता. 21) पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षांनी घेतलेल्या या भूमिकेची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत सभा चालली. सभेत अनेक विषयावर चर्चा झाली. अनेक ठरावांना मंजुरी प्रदान करण्यात आली. यात एक विषय आजी व माजी आमदाराने आणलेल्या रस्ता दर्जोन्नतीच्या कामांना मंजुरी देण्यात यावी, असा होता.

माजी आमदारानं आणलेल्या रस्ता दर्जोन्नतीच्या कामांना मंजुरी देण्याचा विचार झाला, तेव्हा दोन महिन्यांपासून विद्यमान आमदार यांच्या रस्ता दर्जोन्नतीच्या कामांची अध्यक्षाना आठवण झाली. त्यामुळं सभागृहातील अनेक सदस्यांनी मंजुरी प्रदान करायची असेल तर त्यात भेदभाव कशाला असा मुद्दा उपस्थित केला. रस्ता दर्जोन्नतीसाठी राज्य सरकारकडूनच थेट निधी आलेला आहे. तो परत पाठवायचा कशाला, असंही काहींनी लक्षात आणुन दिलं. त्यामुळं अध्यक्षांनी त्यादृष्टीनं चर्चा करायला सांगितली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गोंदिया विधानसभा मतदार संघात आजी-माजी आमदारांचे राजकारण नागरीकांना सर्वश्रूत आहे. वर्चस्व कायम ठेवण्यासाठी माजी आमदाराकडून विद्यमान आमदाराचा कामात ढवळाढवळ केली जात असल्याचा आरोप नेहमीच होतो. त्यामुळं आजी-माजी आमदारांचा विकासकामांचा श्रेयवाद अनेक ठिकाणी बघायला मिळतो. विद्यमान आमदाराने विधानसभा क्षेत्रातील ४० रस्त्यांचे दर्जोन्नतीचे काम खेचून आणले. दुसरीकडे माजी आमदारानेही रस्ता दर्जोन्नतीची कामे आणली आहेत.

Edited by : Prasannaa Jakate

Gondia Zilla Parishad.
Bhandara News : पटोलेंपुढं हजेरीच्या धास्तीनं अधिकाऱ्याला बैठकीत भोवळ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com