Lok Sabha Election 2024 : ‘मेरी झाँशी, नही दूँगी’ भर सभेत ताईंनी व्यक्त केल्या ‘भावना’

Bhavana Gawali : खासदारांचा पुन्हा भर सभेत एल्गार, महायुतीत चूरस रंगणार
MP Bhavana Gawli
MP Bhavana GawliSarkarnama

Yavatmal Politics : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून पुन्हा एकदा महायुतीत कलगीतुरा रंगला आहे. यवतमाळ येथे झालेल्या महायुतीच्या महामेळाव्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी ‘मेरी झाँशी, मै नही दूँगी’ असे म्हणत एकप्रकारे पुन्हा एकदा एल्गारच केला. आता महायुतीपुढे त्यांची उमेदवारी कापण्याचे मोठे आव्हान आहे.

भावना गवळींनी एकप्रकारे त्यांना माझी उमेदवारी कापूनच दाखवा, असा इशारा भाषणातून दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी विविध जिल्ह्यांमध्ये महायुतीचे महामेळावे घेण्याचे ठरले होते. त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळातही एका सभागृहात महायुतीचा मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला पालकमंत्री तथा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार, आमदार ॲड. नीलय सदानाईक, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार इंद्रनील नाईक, आमदार प्रा. डॉ. अशोक उईके, आमदार नामदेव ससाने, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, महादेव सुपारे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष उमाकांत पापीनवार, रिपाईचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर, शिवसेना शिंदे गटाचे श्रीधर मोहोड, पराग पिंगळे, हरिहर लिंगनवार, राष्ट्रवादीचे तारीक साहिर लोखंडवाला, प्रहारचे बिपीन चौधरी आदी उपस्थित होते.

MP Bhavana Gawli
Yavatmal Mahayuti : भावना गवळींचा पत्ता कापण्याचा इंद्रनिल नाईकांचा असाही प्रयत्न

यावेळी झालेल्या कार्यक्रमात महायुतीत पुन्हा ओढताण पहायला मिळाली. कधी एकमेकांचे तोंडही न पाहणारे नेते मात्र, एकाच व्यासपीठावर दिसून आलेत. अनेकांना महायुतीच्या मेळाव्यात या नेत्यांमध्ये दिलजमाई दिसेल, अशी अपेक्षा होती. असे असताना शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी या मेळाव्याला संबोधित करताना ‘मै मेरी झाँशी नही दूँगी’, असे म्हणत अप्रत्यक्षपणे लोकसभेची उमेदवारी आपलीच निश्‍चित, असा संदेश दिला. एवढेच नव्हेतर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाची खासदार आपणच पुन्हा होणार, असा ठाम विश्‍वास दाखविला.

महायुतीत उमेदवारी मिळो ना मिळो मी पुन्हा खासदार होईलच, असा संकेतही त्यांनी व्यासपीठावरील नेत्यांना दिला. त्यांच्या या वक्तव्याने मात्र, महायुतीतील अनेकांच्या आणि उपस्थितांच्या भुवयाच उंचावल्या. परिणामी महायुतीत दिलजमाई नव्हेतर ओढताणच असल्याचे बचित्रच नव्हेतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या कुजबुजीवरूनही स्पष्ट झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीत सहभागी असलेल्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, प्रहार, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यासह अन्य पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते महामेळाव्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

नेत्यांनी भाषणातून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात आपल्या पक्षाच्या उमेदवारीची दावेदारी केली. मात्र, भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी या लोकसभा मतदारसंघाच्या दावेदारीवर कुठलेही सुतोवाच केले नाही. त्यावरून भाजपा जरी यवतमाळ-वाशिम हा लोकसभा मतदारसंघ पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात असली तरी त्यांनी या लोकसभा मतदारसंघाच्या दावेदारीवरून महायुतीच्या मेळाव्यात तरी मौन पाळल्याचे दिसून आले.

Edited By : Prasannaa Jakate

MP Bhavana Gawli
Yavatmal-Washim LokSabha Constituency : भावना गवळींची ‘जायंट किलर’ उपाधी कायम राहील का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com