Sana Khan Murder : सना खान हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पप्पूच्या लॅपटॉपमधून 'ही' धक्कादायक माहिती समोर

Police Investigation : पप्पूच्या लॅपटॉपमधून झाला ‘सेक्सटोर्शनचे रॅकेट’चा खुलासा
Sana Khan
Sana KhanSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या पदाधिकारी सना ऊर्फ हिना खान यांच्या मृत्यूचे गूढ वाढत असतानाच पोलिसांच्या तपासाने वेग पकडला आहे.या प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. भाजपच्या महिला नेत्याला केले जात होते व्हिडीओ क्लिपवरून ‘ब्लॅकमेल’ करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सना खान यांच्या (वय 34) माध्यमातून पप्पू ऊर्फ अमित शाहू हा ‘सेक्सटोर्शनचे रॅकेट’ चालवित असल्याचा धक्कादायक खुलासा यापूर्वीच झाला आहे. पोलिसांनी पप्पू शाहू याचा लॅपटॉप आणि सना खान यांचा मोबाइल जप्त केला आहे. पप्पू हा सना यांचा छळ करत होता, हे त्यातून स्पष्ट होते. त्यामुळे खुनाचे हे प्रकरण आता वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे. पोलिस आयुक्त राहुल मदने यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले की, याप्रकरणात एक मोबाइल आणि लॅपटॉप सापडला आहे. त्यात सना खान यांच्या काही व्हिडीओ क्लिप्स सापडल्या आहेत. सना खान यांच्या हत्याप्रकरणात त्यांचे लैंगिक शोषण तर झाले नाही ना, यादृष्टीने तपास सुरू झाला आहे.

Sana Khan
Sana Khan Murder Case : महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती, पप्पूच्या जबानीवर उपायुक्तांचा शोध !

सना खान 2 ऑगस्टला नागपूर (Nagpur) येथून जबलपूरला जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यानंतर त्यांचा मोबाइल ‘स्वीच ऑफ’ झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी आईसोबत बोलल्यावर त्यांच्या संपर्क तुटला. मुलीला काही झाले असेल, या भीतीने त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. तपासात सना खान यांची हत्या झाल्याचे समोर आले. पप्पू शाहू याला पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. त्यानंतर सनाचा वापर ‘सेक्सटॉर्शन’साठी करण्यात आल्याचे पुरावे सापडले.

पप्पु याच्यासोबत याप्रकरणात आणखी कुणी सना खान (Sana Khan) यांचे शोषण केले काय, याचा शोध पोलिस घेत आहेत. सनाच्या माध्यमातून पप्पू शाहूने मोठी संपत्ती जमवली होती. संपत्तीतील पैसे सातत्याने सना खान मागत होत्या. त्यामुळे सनाला कायमचे संपविण्याच्या हेतूने पप्पूने त्यांची हत्या केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकरणात शाहूविरुद्ध भारतीय दंडसंहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. तपास करताना पोलिसांनी पप्पूच्या बैलखेडा येथील आर्शीवाद ढाब्याजवळ छापा घातला. त्यात त्याचा लॅपटॉप आणि सनाचा मोबाइल जप्त केला. सध्या पप्पूला प्रोडक्शन वॉरंटवर कारागृहातून काढून पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याच्या कोठडीची मुदत शुक्रवारपर्यंत (ता. 5) वाढविण्यात आली आहे.

सना खान आणि पप्पू शाहू यांची चार वर्षांपूर्वी फेसबुकवरून ओळख झाली होती. त्यानंतर वाराणसीला जात असताना पप्पुने सना खान यांना जबलपूर येथून बिर्याणीचा डबा दिला. तेव्हापासून पप्पुची आणि सना खान यांची आणखी घट्ट मैत्री झाली. या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. पप्पुने या माध्यमातून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील मोठ्या व्यक्तींची कोट्यवधींची लुबाडणूक केली.

Sana Khan
UPI Transactions : अवघ्या एक महिन्यात देशभरात 'UPI'द्वारे झाले तब्बल 12.2 अब्ज व्यवहार!

पप्पू शाहू याला सना हिचे अनेकांसोबत व्हिडीओ असल्याची माहिती मिळाली. त्याने ते व्हिडीओ आणि फोटो मिळविले व आपल्याकडे स्टोअर ठेवले. या व्हिडीओमध्ये नागपूरसह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील काही राजकीय पदाधिकारी आणि बड्या असामींचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com