Vidarbha BJP Politics: रवींद्र चव्हाणांनी साधला गडकरी-फडणवीस बॅलेन्स: भेंडे, पोटे, फुकेंकडे विदर्भाची सूत्र; डेहनकरांना बंडखोरीनंतरही बक्षीस

BJP Political News: आता विदर्भातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका वगळता जंबो कार्यकारिणी करण्याचा आणि अनेकांना सामावून घेण्याचा मोह प्रदेशाध्यक्षांनी टाळला असल्याचे दिसून येते. नव्या कार्यकारिणीत मोजक्याच लोकांना स्थान देण्यात आले.
Devendra fadnavis, chandrashekhar bawankule, ravindra chavan
Devendra fadnavis, chandrashekhar bawankule, ravindra chavan sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: भाजपच्या कार्यकारिणीत संजय भेंडे यांची पुन्हा एकदा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जोडीला वर्धा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रामदास तडस आणि अमरावतीमधून माजी आमदार प्रवीण पोटे यांनाही उपाध्यक्ष करण्यात आले आहे. यावेळी पूर्व विदर्भात सचिव म्हणून दोन नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. त्यात आमदार परिणय फुके आणि नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांनी कार्यकारिणी सातत्याने होत असलेल्या निवडणुकांमुळे रखडली होती. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीच कार्यकारिणी आजवर कार्यरत होती. महापालिका निवडणुकीची जबाबदारीसुद्धा बावनकुळे यांच्यावरच सोपवण्यात आली होती. आज मात्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपली कार्यकारिणी जाहीर केली.

आता विदर्भातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका वगळता जंबो कार्यकारिणी करण्याचा आणि अनेकांना सामावून घेण्याचा मोह प्रदेशाध्यक्षांनी टाळला असल्याचे दिसून येते. नव्या कार्यकारिणीत मोजक्याच लोकांना स्थान देण्यात आले. त्यात विदर्भातील केलेला पदाधिकाऱ्यांचा केलेला समावेश बघता केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांचा बॅलन्स साधला असल्याचे दिसून येते.

संजय भेंडे हे लोकसभेच्या निवडणुकीत नितीन गडकरी यांचे प्रमुख होते. येत्या काळात रिक्त होणाऱ्या विधान परिषदेच्या जागेसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. रामदास तडस हे दोन वेळा वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. २०२४च्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. अमरावतीचे प्रवीण पोटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात समावेश होता. अमरावतीचे ते पालकमंत्री होते. अर्चना डेहनकर यांची सचिवपदी केलेली नियुक्ती आश्चर्यकारक मानली जाते.

Devendra fadnavis, chandrashekhar bawankule, ravindra chavan
DGCA Action VSR: अजितदादांच्या विमान अपघातानंतर पहिलीच कारवाई; 'डीजीसीए'ची VSR कंपनीच्या विमान उड्डाणावर बंदी

महापालिकेच्या निवडणुकीत त्यांचे पती विनायक डेहनकर यांनी भाजप उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केली होती. त्यांची नियुक्तीने अनेकांना धक्का बसला आहे. आमदार परिणय फुके हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत.

भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर पाठवायच्या प्रतिनिधीच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचे कट्टर समर्थक राजू जैन यांना पराभवाचा धक्का दिला होता. त्यानंतर त्यांना काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात भंडारा जिल्ह्यातील साकोली विधान सभा मतदारसंघात भाजपने उभे केले होते. ही निवडणूक अतिशय अटीतटीची झाली होती.

Devendra fadnavis, chandrashekhar bawankule, ravindra chavan
Top 10 News : फडणवीस सरकार हादरलं,एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात,अजितदादांच्या विमान अपघातानंतर पहिलीच कारवाई

प्रचारा दरम्यान पैसे वाटप व मारहाणीच्या घटनाही घडल्या होत्या. त्यामुळे शेवटच्या क्षणी नाना पटोले यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाल्याने भाजपची योजना फसली होती. फुके यांची पुन्हा एकदा विधान परिषदेवर नियुक्ती करून भाजपने त्यांना मुख्य राजकीय प्रवाहात कायम ठेवले आहे. आता सचिव म्हणून नियुक्ती करून संघटनेतही सहभागी करून घेतले आहे. गडचिरोलीचे माजी आमदार देवराव होळी यांना अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com