Bhandara Guardian Minister: भंडाऱ्यात भाजपचं धक्कातंत्र! रात्रीत बदलले पालकमंत्री, पंकज भोयर यांच्यावर जबाबदारी

Pankaj Bhoyar Appointed Bhandara Guardian Minister: भाजपचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची सोमवारी रात्री अचानक भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून उलचबांगडी करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.
Sanjay Savkare, Pankaj Bhoyar
BJP leader Sanjay Savkare removed as Bhandara Guardian Minister; Pankaj Bhoyar takes charge to strengthen BJP’s hold in the district.Sarkarnama
Published on
Updated on

Bhandara News, 26 Aug : भाजपचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची सोमवारी रात्री अचानक भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून उलचबांगडी करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.

संजय सावकारे यांच्या जागी आता गृह राज्यमंत्री पंकज भोयर (Pankaj Bhoyar) हे भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून कारभार पाहणार आहेत. तर संजय सावकारे यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मात्र, अचानक झालेल्या पालकमंत्री बदलल्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, राज्याचे वस्त्र उद्योगमंत्री संजय सावकारे हे मागील काही दिवसांपासून भंडाऱ्याचे पालकमंत्री होते. मात्र, ते केवळ झेंडावंदन करण्यासाठीच भंडाऱ्यात येत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात होते.

Sanjay Savkare, Pankaj Bhoyar
Narayan Rane : मनसे-शिवसेना युतीच्या चर्चेला राणेंचा करारा टोला; म्हणाले, 'त्याचं राजकारण संपलं, कशाला दाखवता?, जे बेस्टमध्ये झालं...'

ते भंडारा जिल्ह्याशी संबंधित आढावा बैठकांना केवळ हजेरी लावायचे मात्र जिल्ह्यातील समस्यांवर योग्य ती कारवाई केली जात नव्हती. त्यामुळे भंडाऱ्याला परिसरातीलच पालकमंत्री हवा, अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यामुळेच सावकारेंची उलचबांगडी केल्याचं बोललं जात आहे.

Sanjay Savkare, Pankaj Bhoyar
Vanatara SIT Probe : 'बेकायदा पद्धतीने...'; कोल्हापुरकरांच्या 'माधुरी'ला नेणाऱ्या 'वनतारा'ला सुप्रीम कोर्टाचा दणका : 'त्या' आरोपांनंतर SIT चौकशी करण्याचे आदेश

दरम्यान, अवघ्या काही दिवसांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असताना भाजपने पालकमंत्री बदलल्यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. शिवाय भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यावर भाजपची पकड मजबूत व्हावी, यासाठीच भोयर यांच्याकडे ही नवीन जबाबदारी दिल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com