Malkapur Assembly Result : मलकापूर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराने 2019 चा वचपा काढलाच...

Malkapur Assembly Constituency Election Result 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीने सपाटून मार खाल्ला आहे. अशातच विदर्भातील महत्वाचा मानला जाणारा मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल देखील समोर आला आहे.
Rajesh Ekade, Chainsukh Sancheti
Rajesh Ekade, Chainsukh SanchetiSarkarnama
Published on
Updated on

Malkapur Assembly Constituency Election Result 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सपाटून मार खाल्ला आहे.

अशातच विदर्भातील (Vidarbha) महत्वाचा मानला जाणारा मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल देखील समोर आला आहे. मलकापूर विधानसभा मतदारसंघातून यावेळी काँग्रेसकडून राजेश एडके तर भाजपकडून चैनसुख मदनलाल संचेती यांच्यात प्रमुख लढत झाली होती.

या दोन उमेदवारांसह वंचित बहुजून आघाडीचे डॉ.मोहम्मद जमीर साबिरोद्दीन आणि रासपचे प्रवीण लक्ष्मण पाटील आणि बसपचे धीरज इंगळे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, आता या मतदारसंघातलं चित्र स्पष्ट झालं असून भाजपचे (BJP) उमेदवार चैनसुख संचेती यांचा विजय झाला आहे.

Rajesh Ekade, Chainsukh Sancheti
Savner Election Result : आशिष देशमुखांनी 30 वर्षांनी काढला वडिलांच्या पराभवाचा वचपा; केदारांच्या वर्चस्वाला हादरा

मतमोजणीच्या सुरूवातीपासूनच या मतदारसंघात त्यांनी आघाडी घेतली होती. संचेती यांनी या विधानसभा निवडणुकीत आपल्याकडे विजय खेचत आणून मागील विधानसभेच्या पराभवाचा वचपा काढला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मलकापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या (Congresss) राजेश एकाडे यांनी भाजपच्या चैनसुख मदनलाल संचेती यांचा पराभव केला होता.

Rajesh Ekade, Chainsukh Sancheti
Aurangabad East Assembly Result News : 'काँटे की टक्कर' पण भाजपच्या अतुल सावेंनी एमआयएमचा 'पतंग' कापलाच!

2019 च्या विधानसभा निवडणुकीत राजेश एकाडे यांना 86 हजार 276 मतं मिळाली होती. तर भाजपच्या चैनसुख संचेती यांना 71 हजार 892 मते मिळाली होती. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या नितीन नंदुरकर यांना 12 हजार 549 मते मिळाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com