Chandrapur Politics : चंद्रपूरमध्ये मोठा राडा, 'आप'च्या पदाधिकाऱ्याला धमकी; भाजपच्या शहराध्यक्षाविरोधात पोलिसात तक्रार

Police Chandrapur BJP AAP : चंद्रपूरमधील राजकीय वातावरण सध्या पेटले आहे. भाजपच्या शहराध्यक्षाविरुद्ध 'आप'ने पोलिसांमध्ये धाव घेतली आहे.
BJP VS AAP
BJP VS AAP sarkarnama
Published on
Updated on

Chandrapur Politics : महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात भाजप आणि आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा वॉर सुरू आहे. यातच भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केल्याने 'आप'च्या पदाधिकाऱ्याला धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आले आहे. भाजपच्या शहराध्यक्षाच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असल्याने चंद्रपूरचे राजकारण चांगलेच तापले आहे.

'आप'चे चंद्रपूर शहर संघटक संतोष बोपचे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उद्देशून ‘काम करा ढोंग नको' अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टावार यांनी त्यांना थेट फोनवरून धमकावले. तू बावनकुळे यांच्या पोस्टवर कॉमेंट केली, आमच्याशी पंगा घेऊ नको, तू मला साधासुधा समजू नको, तू मला ओळखत नाही, तुला बघून घेईल असे म्हणून कासनगोट्टावार यांनी हिंमत असले तर पोलिसात तक्रार कर, अशा शब्दात बोपेचे यांना धमकी दिली.

या विरोधात बोपचे यांनी थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. भाजपचे शहराध्यक्ष खुलेआम धमक्या देत आहेत. हे कायद्याच्या विरोधात आहे. आम्ही त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या त्यांची जागा दाखवून देऊ, अशी प्रतिक्रिया बोपचे यांनी व्यक्त केली.

BJP VS AAP
Chitra Wagh On Manoj Jarange Patil : जरांगेंच्या टीकेनंतर चित्रा वाघ कडाडल्या! 'काय उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही'..

शहरात रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. पिण्याच्या पाणी पुरवठा नियमित होत नाही. साफसफाईचे कामे होत नाही. आपचे कार्यकर्ते, पदाधिकारी म्हणून आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करीत आहोत. मात्र ते सत्ताधारी भाजपला सहन होत नाही. त्यांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी ते धमक्या देतात. भाजपच्या शहराध्यक्षाने यापूर्वीसुद्धा एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केली होती. ही घटना जनता विसरलेली नाही. त्यांनी आम आदमी पार्टीला नव्हे तर पुन्हा जनतेलाच धमकी दिली आहे. येणाऱ्या निवडणुकीत याची किंमत भाजपला चुकवावी लागले असा इशारा 'आप'ने या प्रकरणावर दिला आहे.

या धमकीवर कासनगोट्टावार म्हणाले, फेसबुकवर काहीही लिहिणे आणि भाजपच्या नेत्यांवर टीका करणे योग्य नाही. सोशल मीडियावर कुणाच्याही बाबत अपशब्दांचा वापर करणे चुकीचे आहे. अशा प्रकारचे राजकारण यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात बघितले नाही.

BJP VS AAP
Navneet Rana On Manoj Jarange : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; नवनीत राणा म्हणाल्या, 'हिंदूंच्या सणाला...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com