Chandrapur News : सुधीरभाऊंच्या हातातून चंद्रपूरही निसटणार? जोरगेवार 'मुनगंटीवारांच्या' वर्चस्वावर अखेरचा घाव घालणार

Chandrapur News : लोकसभा निवडणुकीतील पराभव ओढावून घेतल्यानंतर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हातातून सत्ताकेंद्रच निसटले. राज्याच्या मंत्रिमंडळातून डच्चू देऊन वर्चस्व कमी करण्यात आले आहे. आता त्यांना जिल्ह्यातून धक्के देण्यास सुरुवात झाली आहे.
BJP’s Chandrapur unit faces internal conflict as Sudhir Mungantiwar and MLA Kishor Jorgewar engage in a leadership battle.
Sudhir Mungantiwar and Kishor JorgewarSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur News : लोकसभा निवडणुकीतील पराभव ओढावून घेतल्यानंतर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हातातून सत्ताकेंद्रच निसटले. राज्याच्या मंत्रिमंडळातून डच्चू देऊन वर्चस्व कमी करण्यात आले आहे. आता त्यांना जिल्ह्यातून धक्के देण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या विरोधात जिल्ह्यातील सर्वच आजी-माजी आमदार एकवटले आहेत. जिल्हा भाजप आणि कार्यकर्ते त्यांच्या इशाऱ्यावर चालणार नाही याची व्यवस्था केली जात आहे.

सुधीर मुनगंटीवर यांचे आजवर चंद्रपूर जिल्ह्यात वर्चस्व होते. कोणाला शहराध्यक्ष, महापालिकेत कोण उमेदवार असणार? नगपालिकेत कोण उमेदवार असणार? कोण महापौर आणि कोण नगराध्यक्ष असणार असे सगळे निर्णय मुनगंटीवारच घ्यायचे. त्यांचा शब्द भाजपात अंतिम मानला जात होता. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. ज्या जोरगेवार यांना मुनगंटीवार यांनी पक्षात घेण्यास विरोध केला होता तेच जोरगेवार विधानसभेला मोठ्या फरकाने निवडून आले. आता जोरगेवारांचा जिल्ह्यात चांगलाच जोर वाढला आहे.

जोरगेवार यांच्या मदतीला माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, आमदार बंटी भांगडिया, माजी मंत्री शोभाताई फडणवीस हेसुद्धा धावून आले. सर्वांनाच आपले जुने राजकीय हिशेब फेडायचे आहेत. यापूर्वी मुनगंटीवार यांनी सुचवलेल्या मंडळ अध्यक्षांच्या नावांना जोरगेवार यांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे अगदीच किरकोळ समजल्या जाणाऱ्या मंडळ अध्यक्षांची निवडही प्रतिष्ठेची झाली. त्यांच्या विरोधामुळे ही प्रक्रियाच स्थगित करण्यात आली.

BJP’s Chandrapur unit faces internal conflict as Sudhir Mungantiwar and MLA Kishor Jorgewar engage in a leadership battle.
Chandrapur BJP leadership : मुख्यमंत्र्यांच्या काकू, माजी मंत्री शोभाताई फडणवीसांना अभिप्राय का नोंदवता आला नाही?

आता जोरगेवार मुनगंटीवार यांच्या वर्चस्वावर आणखी एक घाव घालण्याच्या तयारीत आहेत. शहर आणि ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी आपला पसंतीचा माणूस असावा, यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. चंद्रपूर भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे आणि ग्रामीणचे अध्यक्ष हरीश शर्मा हे मुनगंटीवारांचे निकटवर्तीय मानले जातात. दोघांचाही कार्यकाळ अद्याप संपायचा आहे. मात्र संघटनात्मक निवडणुका जाहीर झाल्याने त्यांना बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत.

राहुल पावडे हे पुन्हा याच पदावर रहावेत यासाठी मुनगंटीवार आग्रही आहेत. तर आमदार जोरगेवार समर्थक सुभाष कासनगोवार, दशरथसिंग ठाकूर, डॉ. मंगेश गुलवाडे हेसुद्धा महानगर जिल्हाध्यक्ष होण्याच्या रांगेत उभे आहेत. आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरचे जिल्हाध्यक्ष पद आमदार जोरगेवार यांच्यासाठी महत्त्वाचे राहणार आहे.

ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मासुद्धा आमदार मुनगंटीवार समर्थक आहे. पण इथेही ब्रह्मपुरीचे क्रिष्णा सहारे, विवेक बाढे, नामदेव डाहुले आहेत इच्छुक आहेत. विधानसभा निवडणुकीत राज्याचे तत्कालीन विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे सहारे यांच्याविरोधात केवळ हजार मतांनी निवडून आले. त्यामुळे त्यांच्या नावावर पसंतीची मोहोर उमटू शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

BJP’s Chandrapur unit faces internal conflict as Sudhir Mungantiwar and MLA Kishor Jorgewar engage in a leadership battle.
Chandrapur News : फडणवीस, जोरगेवार अन् अहिरांची एकत्रित खेळी; 'मुनगंटीवारांना' चेपवायचचं ठरवलंय!

ही दोन्ही पदे हिसकावून आमदार मुनगंटीवारांचे आजवरचे संघटनेवरचे वर्चस्वच काढून घेण्याचा प्रयत्न त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांचा आहे. नुकतेच या दोन्ही पदांसाठी अभिप्राय नोंदवण्यात आले. संपूर्ण प्रक्रियेनंतर अध्यक्षांची नावे जाहीर केली जाणार आहेत. पण मुनगंटीवार यांनी सुचवलेल्या जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांच्या नावाला सर्वच आजी-माजी आमदारांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून विरोध करण्यात आला आहे.

भाजपअंतर्गत गटातटाचे राजकारण बघता आमदार मुनगंटीवार गटाला ग्रामीण किंवा शहर यापैकी एक जिल्हाध्यक्ष मिळेल असे बोलले जाते. त्यामुळे पावडे किंवा शर्मा या दोघांपैकी एकाची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. अभिप्राय नोंदविल्यानंतर जिल्हाध्यक्ष पदाचा निर्णय योग्यता बघून प्रदेशपातळीवरूनच होईल. ही केवळ औपचारिकता आहे, असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com