Local Body Elections : निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा झटका; बंटी भांगडियांच्या 'व्होट बँके'ला खिंडार

BJP MLA Bunty Bhangdia Faces Political Shock : नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या जागावाटपावरून जूनेद खान आणि आमदार भांगडिया यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे.
BJP leader Junaid Khan announces resignation in a major setback to MLA Bunty Bhangdia’s political support base in Chimur.
BJP leader Junaid Khan announces resignation in a major setback to MLA Bunty Bhangdia’s political support base in Chimur.Sarkarnama
Published on
Updated on

Impact of Resignation on Chimur Constituency Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने सर्वांसाठी आपली दारे उघडी केली आहे. रोज वेगवेगळ्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जात जात आहे. राज्यात आणि केंद्र भाजपची सत्ता असल्याने प्रवेश करणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढली आहे. असे असले तरी चंद्रपूर जिल्ह्यात मोठी घडामोड घडली. चिमूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार बंटी भांगडिया यांना मोठा धक्का बसला आहे.

भांगडिया यांचे कट्टर समर्थक आणि भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश महामंत्री जुनेद खान यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. हा बंटी भांगडिया यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत जुनेद खान आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या जागावाटपावरून त्यांचे आणि आमदार भांगडिया यांचे खटके उडाल्याचे समोर आले आहे. खान यांच्या काही समर्थकांना तिकीट हवे होते. मात्र आमदारांनी त्यास नकार दिला. त्यामुळे नाराज झालेल्या खान यांनी आमदारांसोबत कायमचे संबंध तोडून टाकण्याचा निर्णय घेतला.

BJP leader Junaid Khan announces resignation in a major setback to MLA Bunty Bhangdia’s political support base in Chimur.
Delhi Car Blast update : दिल्ली स्फोटानंतर मोदी सरकारचा मोठा निर्णय; IPS विजय साखरे यांच्या ‘स्पेशल 10’ टीमवर महत्वाची जबाबदारी...

चिमूर विधानसभा मतदारसंघात जुनेद खान मोठे नाव आहे. त्यांच्या समर्थकांची संख्याही भरपूर आहे. मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये त्यांच्यामुळे भाजपला प्रवेश मिळाला होता. राजकारणात येण्यापूर्वी बंटी भांगडिया यांची युवा शक्ती संघटना होती. या संघटनेच्या स्थापनेपासून जुनेद खान त्यांच्यासोबत होते. ते संस्थापक संस्थांपैकी एक आहेत. मात्र बंटी भांगडिया यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर या संघटनेचे अस्तित्व संपुष्टात आले.

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात भांगडिया यांनी चांगलाच जम बसवला आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. काँग्रेससह अनेक विरोधकांना त्यांनी आपल्या गटात घेऊन या बँकेवर भाजपची सत्ता आणली आहे. भाजपमध्ये त्यांचे वजन वाढत असताना दुसरीकडे त्यांचे एक एक निष्ठावंत कार्यकर्ते त्यांना सोडून चालले आहेत.

BJP leader Junaid Khan announces resignation in a major setback to MLA Bunty Bhangdia’s political support base in Chimur.
MCA Election News : प्रतिष्ठा पणाला; जितेंद्र आव्हाड अन् मिलिंद नार्वेकरांसाठी फडणवीसांच्या विश्वासू नेत्यानं टाकला 'डाव'...

जुनेद खान यांच्या प्रवेशामुळे मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये काँग्रेसला पुन्हा शिरकाव करता येणार आहे. या वस्त्यांमध्ये त्यांना हक्काचा नेता लाभणार आहे. या फायदा काही नगर पालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला होईल, असा अंदाज बांधला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com