Maharashtra Political News: उद्धव ठाकरे यांनी नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा मेळावा घेतल्याने राजकीय वातवरण तापले आहे. ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जमानत जप्त करा, असे आपल्या भाषणात सांगून भाजपला डिवचले.
त्याला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढावी आणि निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे.
उद्धव ठाकरे वैफल्याग्रस्त झाले आहेत. केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते टीका करतात. ते आजवर कुठल्याच विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले नाही. त्यामुळे जिंकून येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मुख्यमंत्री होण्यासाठी मागच्या दाराने आमदारकी मिळवली. याउलट देवेंद्र फडणवीस लोकनेते आहेत. ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत, असे बावनकुळे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांचे नेतृत्त्व कुणी स्वीकारायला तयार नाही. म्हणूनच त्यांचे आमदार बाहेर पडले असल्याचा आरोपही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे वाघ होते.
हिंदू विचार महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनात जागवणारे बाळासाहेब ठाकरे याचे सुपुत्र उध्दव ठाकरे ही एकमेव ओळख त्यांची आहे. मात्र त्यांनी हिंदुत्वाचा विचार संपविला आहे. त्यामुळेच त्यांना काँग्रेस सोबत जावे लागले आहे, असा टोला ही बावनकुळेंनी लगावला.
100 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगवास भोगावा लागलेल्या अनिल देशमुख व 150 कोटींच्या भ्रष्टाचारच्या आरोपात आमदारकी गमावलेल्या सुनील केदार यांची सोबत त्यांना करावी लागत आहे. महाआघाडीने विधानसभेच्या निवडणुकी आधीच हार पत्करली याचे हे लक्षण असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.