Nagpur Central Assembly constituency : मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात बहुसंख्य असलेला हलबा समाजाचे मतदान विधानसभेच्या निवडणुकीत निर्णायक मानले जाते. हलबा समाजाच्या उमेदवाराने पंधरा वर्षापूर्वी या मतदारसंघात भाजपला खाते उघडून दिले होते.
आता या मतदारसंघात भाजपचे युवा नेते, ओबीसी चेहरा अशी ओळख असलेले विधान परिषदेचे आमदार प्रवीण दटके(Pravin Datke) निवडणुकीची जोरदार तयारी करीत आहेत. यातच हलबा समाजाच्या नोकरदारांची मोठी अडचण दूर करणारा निर्णय महायुती सरकारने घेऊन समाजाची भाजपवर असलेली नाराजी दूर केली. ही बाब आता दटके यांच्या पथ्यावर पडू शकते.
विधानसभेची निवडणूक(Vidhan Sabha Election) येत्या दहा दिवसांच्या आत जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महायुती सरकारने या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचे मोठमोठे निर्णय घेतले आहेत. यात हलबा समजातील अधिकसंख्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलसा दिला आहे. २०१९ च्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले होते. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या होत्या. अनेकांना अधिसंख्य पदावर वर्ग करून तात्पुरता दिलासा देण्यात आला होता.
असे असताना कर्मचाऱ्यांना सेवा विषयक आणि सेवानिवृत्ती विषयक लाभ मिळण्यास अडचणी येत होत्या. नागपूर(Nagpur) शहरातील सुमारे पाच हजार आणि राज्यातील ३० हजार अधिसंख्य कर्मचारी यामुळे त्रस्त होते. २०२२ मध्ये अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक लाभ देण्याबाबत निघालेल्या शासन निर्णयामध्ये एक दिवसाचा तांत्रिक खंड देण्यात आला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतनवाढ तसेच सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्यास अडचणी येत होत्या.
आमदार प्रवीण दटके यांनी शासनाकडे हा प्रश्न सातत्याने लावून धरला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने राज्यातील हजारो अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा विचार करत त्यांच्या सेवेतील एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित करण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे अफ्रोह संघटनेच्या माध्यमातून अधिसंख्य कर्मचाऱ्यांनी उपोषण, धरणे आंदोलन तसेच विविध मार्गातून हा विषय पूर्ण होण्याकरिता पाठपुरावा केला. याबाबत आमदार प्रवीण दटके यांच्या मागणीनुसार हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे बैठक घेऊन या विषयाला गती देण्यात आली. आता यावर महायुती सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्याने नागपूरसह विदर्भ व संपूर्ण राज्यातील अंदाजे ३० हजार कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. तसेच नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सेवाविषयक लाभ आता अधिसंख्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.