Shobha Fadnavis comments : मुख्यमंत्र्यांच्या काकू टोचून बोलल्या'; मुनगंटीवार, पावडे अन् जोरगेवारांना चांगल्याच मिरच्या झोंबल्या...

BJP Foundation Day Chandrapur Sudhir Mungantiwar Kishor Jorgewar Shobha Fadnavis : भाजप स्थापना दिनी चंद्रपूर इथं वेगवेगळ्या कार्यक्रमावर शोभा फडणवीस यांनी केलेल्या टिप्पणी आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रतिक्रिया दिली.
Shobha Fadnavis comments
Shobha Fadnavis commentsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra BJP leaders : भाजपचा काल स्थापना दिनी देशभरात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. राज्यात भाजप नेते, मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल फुंकला.

भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य कार्यक्रमात सहभागी झाला होता. चंद्रपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काकू, तथा माजी मंत्री शोभा या देखील कार्यक्रमात सहभागी होत, गटबाजीवरून, भाजपचा काँग्रेस करू नका, अशी झोंबणारी टिप्पणी केली. यावर आता भाजप अंतर्गत प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

शोभा काकू यांची ही टिप्पणी भाजप (BJP) आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार आणि चंद्रपूरचे शहराध्यक्ष राहुल पावडे यांना उद्देश होती. शोभा काकू यांची ही टिप्पणी या तिघांना मिरच्या जशा झोंबतात, तशी झोंबली असल्याचे आता चर्चा आहे. या तिघांनी यावर आज प्रतिक्रिया दिली आहे.

Shobha Fadnavis comments
Ahilyanagar Karjat : क्षमता नसलेल्या नगरसेवकांना पवारांमुळे जनाधार; उषा राऊतांनी खुर्चीला चिकटणारी नसल्याचे म्हणत बंडखोरांवर डागली तोफ

शोभा फडणवीस यांना चंद्रपूरमधील भाजप स्थापन दिनाच्या कार्यक्रमात गटबाजी दिसली. यावरून शोभा काकूने मुनगंटीवार यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. आज यावर दोन्ही गटाकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. काल स्थापनदिनाचा कार्यक्रम सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतंत्रपणे आयोजित केला.

Shobha Fadnavis comments
Shiv Sena Vs BJP : 'दरबार दरबार खेळू या'! भाजपचा 'जनता', तर शिंदेसेनेचा 'लोक' दरबार!

भाजपमध्ये आजवर असे कधी घडले नाही. यामुळे संतापून मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभा फडणवीस यांनी मुनगंटीवार यांना नाव न घेता भाजपचा काँग्रेस करू नका, अशी टिप्पणी केली. मुनगंटीवार गटाचे शहराध्यक्ष राहुल पावडे यांनी प्रतिक्रिया देत, अपुऱ्या माहितीच्या आधारावर शोभा काकू यांनी टिप्पणी केली आहे. तशी त्यांनी ती करायला नको होती. आमचा कार्यक्रम हा पक्षाने दिलेल्या नियोजनुसारच होता, याकडे पावडे यांनी लक्ष वेधले.

मुनगंटीवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया

आमदार किशोर जोरगेवार यांनी आपला कार्यक्रम अधिकृत होता, असे सांगून आपण आमदार मुनगंटीवार यांना कार्यक्रमाचे रितसर निमंत्रण दिले होते, असे सांगितले. मात्र, या संपूर्ण विषयावर प्रतिक्रिया देण्यास मुनगंटीवार यांनी नकार दिला. शोभाताईंनी माझे कुठेही नाव घेतलेले नाही. त्यामुळे मी या विषयात माझे बोलणे योग्य नाही, अशी दोन वाक्यात प्रतिक्रिया देत मुनगंटीवार यांनी विषय संपवला.

शोभा फडणवीस नेमकं काय म्हणाल्या...

मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी सुधीर मुनगंटीवारांचे कान टोचले. एकाच शहरात भाजपच्या स्थापना दिनाचे दोन कार्यक्रम का घेतले? आपली काँग्रेस झाली का? चंद्रपूरच्या स्थानिक आमदाराने कार्यक्रम ठेवला होता. सर्वांनी मोठेपण देऊन त्यांच्या कार्यक्रमाला येणे अपेक्षित होते, असे शोभा फडणवीस यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com