Nana Patole : पटोलेंनी राजीनामा द्यावा, राजकीय संन्यास घ्यावा; अन्यथा..., भाजपने दिला इशारा

BJP On Nana Patole Viral Video: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेशी संबंधित व्हीडिओ व्हायरला होताच भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 18 June : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेशी संबंधित व्हीडिओ व्हायरला होताच भाजपने पटोले यांना टार्गेट केलं आहे. शिवाय कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणाऱ्या पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी देखील आता भाजपने केली आहे.

अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय एक कार्यकर्ता धूत असल्याचा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या गाडीमध्ये बसले आहेत आणि एक कार्यकर्ता त्यांचे पाय धुताना दिसत आहे. पटोले यांच्या याच कृतीवर आक्षेप घेत भाजपने त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे.

शिवाय गांधी घराण्यातील नेता पूजनाची परंपरा पटोले (Nana Patole) पूजनापर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. कार्यकर्त्यांकडून पाद्यपूजा करून घेण्याचा धक्कादायक प्रकार पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासणारा आहे. याचे जाहीर प्रदर्शन करणाऱ्या नाना पटोलेंनी ताबडतोब पदाचा राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घ्यावा अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी केली आहे.

Nana Patole
Nana Patole : काँग्रेस कार्यकर्त्यांनं धुतले पाय; वादात सापडलेल्या पटोलेंचं 'हे' स्पष्टीकरण

देशाच्या राजकारणात काँग्रेसने (Congress) व्यक्तिपूजेची परंपरा सुरू केली. गांधी घराण्याचे हुजरे यामध्ये आघाडीवर राहिले. याच परंपरेचा शिरकाव काँग्रेसमध्ये तळागाळात पोहोचला आहे. अनेक निवडणुकांमध्ये सातत्याने होणाऱ्या पराभवानंतर काही जागांवर मिळालेल्या यशामुळे हुरळून गेलेल्या पटोले यांच्या अशा सरंजामशाहीला महाराष्ट्राच्या राजकारणात थारा दिला जाणार नाही, असेही सुधाकर कोहळे यांनी म्हटलं आहे.

बुवाबाजी सुरू करा

पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेस बट्टा लावणाऱ्या या कृतीबद्दल प्रायश्चित्त म्हणून पटोले यांनी राजकीय संन्यास घेऊन बुवाबाजी सुरू करावी व प्रदेशाध्यक्षपदावर पाणी सोडावे, अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारू असा इशाराही भाजपचे दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com