Amit Shah in Akola : केंद्रीय गृहमंत्री घेणार पश्चिम विदर्भाचा आढावा; नाव निश्चितीची शक्यता?

Lok Sabha Election 2024 : भाजपकडून डाटा जुळविण्याचे काम पूर्ण. कोण्याच्या चेहऱ्यावर फुलणार हास्य, कोणाला मिळणार डच्चू?
Amit Shah
Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Amit Shah in Akola : आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ‘मिशन 45’चा नारा देणाऱ्या भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे राज्यातील दौरे वाढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पश्चिम विदर्भाच्या दौर्यावर येणार आहेत. पूर्वीचा दौरा रद्द करण्यात आल्यानंतर आता 5 मार्चला शाह अकोला दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे हा दौरा पश्चिम विदर्भासाठी खूपच महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात पश्चिम विदर्भाच्या सर्व मतदारसंघासाठी उमेदवार निश्चित होण्याची दाट शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. केंद्रीय नेत्यांकडून विशेष लक्ष महाराष्ट्राकडे दिले जात आहे. त्यामुळे केंद्रीय नेत्यांचे दौरेही राज्यात वाढले आहेत. राज्यात भाजपचे ‘मिशन 45’ राबविण्यात येत आहे. त्यासाठी भाजपकडून रणनीती आखली जात आहे. याही निवडणुकीत विदर्भातील मतदारसंघावर भाजपचे लक्ष आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला मोठे यश विदर्भात मिळाले होते. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच यवतमाळ दौऱ्यावर आले होते. आता याच पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येणार आहेत. अमित शाह 5 मार्चला अकोल्यात असतील. अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amit Shah
Akola BJP : नेत्यांनी मागवली यादी कर्मचाऱ्यांची, बघणार कशी होत नाही स्वच्छता आता शहराची

अकोला येथे भाजप ‘क्लस्टर’च्या बैठकीला शाह उपस्थित राहणार आहेत. अमित शाह यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून देखील जोरदार तयारी केली जात आहे. अकोला दौऱ्यात पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ-वाशिम या चारही मतदारसंघातील महत्वाची नेत्यांची शाह हे बैठक घेणार आहेत. या बैठकीत उमेदवारांची चाचपणी होणार आहे. त्यामुळे या दौऱ्याला अधिक महत्व आले आहे. महायुतीकडून अमरावतीचा उमेदवार निश्चित करण्यात आला असला तरी, वाशिम-यवतमाळ, बुलढाणा आणि अकोला या मतदारसंघातील उमेदवार अद्यापही निश्चित करण्यात आलेले नाहीत. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनीत राणा यांच्या नावाची घोषणा केली होती. परंतु न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या निकालावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा गड आहे. यवतमाळ आणि बुलढाण्यावर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा दावा आहे. यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार भावना गवळी यांनी आधीच ‘मेरी झांशी नही दूंगी’ असे स्पष्टपणे सांगितले आहे. यवतमाळ-वाशिमधून भावना गवळी यांच्या नावाला प्रचंड विरोध आहे. अमरावतीमध्येही भाजप, प्रहार नवनीत राणा यांच्या विरोधात आहेत. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना काट्याची टक्कर देणारा उमेदवार भाजपला लागणार आहे. त्यामुळे अमित शाह यांना या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करावा लागणार आहे. बुलढाण्यावरदेखील भाजपकडून दावा करण्यात येत आहे. त्यामुळे या मतदारसंघाचा आढावाही अमित शाह घेणार आहेत.

Amit Shah
Akola Municipal Corporation : खरोखर होणार का नव्या इमारतीचे स्वप्न साकार?

पश्चिम विदर्भातील सर्वांत महत्वाचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या अकोला मतदारसंघात भाजपकडून आगामी निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. या मतदारसंघात विद्यमान खासदार संजय धोत्रे हे निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट आहे. त्यांच्या जागी भाजपकडून उमेदवार कोण? या प्रश्नाचे उत्तर अमित शाह यांच्या दौऱ्यात मिळण्याची दाट शक्यता आहे. या मतदारसंघात प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा भाग्य आजमाविणार असल्याने भाजपला त्यांच्या तोडीचा उमेदवार शोधावा लागणार आहे. अकोला मतदारसंघात लढण्यासाठी संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यानंतर डॉ. रणजित पाटील, नारायणराव गव्हाणकर, डॉ. रणजित सपकाळ, अनंतराव देशमुख आदींच्या नावाची चर्चेत आहेत. ऐनवेळी भाजप कुणाला उमेदवारी देणार हे पाहावे लागणार आहे.

Amit Shah
Akola Municipal Corporation : ‘क्या पडा है उस अकोला में?’ कविता द्विवेदींच्या जागेवर अधिकाऱ्याची शोधाशोध

भाजपकडून ‘चारसौ पार’साठी पश्चिम विदर्भातील प्रत्येक मतदारसंघातून कोणता उमेदवार सक्षम आहे हे शाह बघणार आहेत. शाह यांच्या दौऱ्यात पश्चिम विदर्भातील लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत जवळपास स्पष्टता येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे साहजिकच उमेदवारीच्या प्रतीक्षेत असलेल्यांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. शाह यांच्या अकोला दौऱ्यात काय ठरते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. अगदी काही तासांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळात येऊन गेले. मात्र त्यांनी विदर्भातील कोणत्याही मतदारसंघात काय चित्र असेल यावर भाष्य करणे टाळले. त्यामुळे मोदींच्या दौऱ्यानंतरही पश्चिम विदर्भातील महायुतीच्या उमेदवारांबाबत ‘सस्पेन्स’ कायम आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Amit Shah
Akola Zilla Parishad : बुलढाण्यानंतर अकोला सीईओ उगारणार का शिस्तीची छडी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com