Akola Corporation : अकोला महापालिकेच्या आयुक्त कविता द्विवेदी यांच्यासह 12 आयएएस अधिकाऱ्यांची बदली आदेश सरकारने शुक्रवारी (ता. 23) काढले. अकोल्यात नियुक्ती मिळाल्यापासून सातत्याने बदलीच्या प्रयत्नात असलेल्या द्विवेदी यांना अखेर आपल्या मनाप्रमाणे बदली मिळाल्याचे या आदेशांवरून दिसत आहे. मात्र, आता सरकारला द्विवेदी यांच्या जागेवर अकोल्यात नियुक्ती घेण्याची तयारी असलेल्या अधिकाऱ्याची शोधाशोध करावी लागत आहे. Akola Municipal Corporation
अकोल्यात महापालिका स्थापन झाल्यापासून येथे आयएएस दर्जाचे अधिकारी नियुक्ती घेण्यास तयार नसतात. जे येतात त्यांची काही दिवसांतच बदली होते. कामाच्या व्यापापेक्षा अकोल्यात डोक्याला जास्त ताप असल्याने ‘क्या पडा हे उस अकोला में?’ असे म्हणत प्रशासकीय अधिकारी अकोला महापालिका आयुक्त पद आयते मिळत असतानाही घेत नाहीत. त्याऐवजी ते कमी दर्जाच्या पदावर काम करणे पसंत करतात. अकोल्यात आल्यापासूनच कविता द्विवेदी यांच्याबाबतही असेच झाले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अकोल्यात नियुक्ती मिळाल्यापासूनच त्या बदलीच्या सातत्याने प्रयत्नात होत्या. कधी प्रशिक्षण तर कधी खासगी कारणांमुळे त्या रजेवरही होत्या. अकोला महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळातही त्या येथे काम करण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्टपणे सांगण्यात येत होते. अशातच अखेर त्यांना जे हवे होते ते आता झाले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी द्विवेदी यांची बदली करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे बरखास्त असलेल्या अकोला महापालिकेचा कारभार प्रभारी प्रशासकाच्या भरवशावर चालणार आहे. सरकारकडून अकोला महापालिका आयुक्तपदासाठी काही अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली. मात्र, कोणीही तयारी दर्शविली नाही.
नव्या दमाचे आयएएस अधिकारीदेखील महापालिकेत नियुक्ती घेण्यास तयार आहेत. मात्र, या यादीत त्यांना अकोला महापालिकेचे नाव नको आहे. अमरावती महसूल विभागात आणि ठराविक अधिकारी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदली घेत असतात. आता त्यापैकीच एखादा अधिकारी अकोला महापालिकेसाठी सरकारला पाहवा लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अकोला महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले गैरप्रकार आणि येथील प्रशासकीय सुस्ती पाहता चांगल्या व शिस्तप्रिय आयुक्ताची येथे गरज आहे. मात्र, महापालिका निवडणुकीनंतर पूर्णवेळ आयुक्ताला येथील राजकीय नेते टिकू देतील का, असा प्रश्न साऱ्यांनाच भेडसावत आहे. त्यामुळे तूर्तास तरी अकोला महापालिका आयुक्तपदाच्या खुर्चीचा प्रभारी अधिकाऱ्याचे तोंड पाहवे लागणार आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.