BJP Politics : "उघड दार 'देवा भाऊ' आता" : मंत्री न केलेल्या भाजप आमदाराचे CM फडणवीसांना भजनातून गाऱ्हाणे

BJP Politics : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिपद न मिळाल्याने भजन गायले असून, या भजनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळात पुनरागमनासाठी विनंती केल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
BJP leader Sudhir Mungantiwar performs a bhajan appealing to CM Devendra Fadnavis for re-entry into the state cabinet.
BJP leader Sudhir Mungantiwar performs a bhajan appealing to CM Devendra Fadnavis for re-entry into the state cabinet.Sarkarnama
Published on
Updated on

Sudhir Mungantiwar : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळाच्या बदलाचे वेध लागले आहेत. मध्यंतरी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. शहा यांनीच त्यांना तातडीने दिल्लीत बोलावून घेतले असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे सुधारभाऊंच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. मात्र मंत्रिमंडळाचा दारे अद्याप त्यांच्यासाठी बंदच आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात देवा भाऊ आपल्यासाठी कधी मंत्रिमंडळाचे दार उघडतात याकडे मुनगंटीवार यांचे लक्ष लागले आहे. त्यातच त्यांनी ‘देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा आता, उघड दार देवा" हे भजन आपल्या खड्या आवाजात गाऊन ‘देवा‘भाऊंना साकडे घातल्यची चर्चा आहे. सध्या सुधीर भाऊंच्या भजनाची चांगलीच चर्चा राज्यात रंगली आहे.

सुधीर मुनगंटीवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात वित्तमंत्री होते. महायुतीच्या अडीच वर्षांच्या सरकारमध्ये ते वनमंत्री आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री होते. राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आल्यानंतर सुधीर भाऊंचे मंत्रिमंडळातील स्थान पक्के असेच गृहित धरले जात होते. मात्र देवाभाऊंनी त्यांना मोठा धक्का दिला.

BJP leader Sudhir Mungantiwar performs a bhajan appealing to CM Devendra Fadnavis for re-entry into the state cabinet.
Devendra Fadnavis News: बच्चू कडूंसोबतच्या बैठकीनंतर फडणवीस सरकारचा कर्जमाफीसंदर्भात मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला मंत्रिमंडळाबाहेर टेवल्याने चंद्रपूरच नव्हे तर भाजपच्या अनेक नेत्यांमध्येही मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. आजही सुधीर भाऊंना का वगळले अशी विचारणा होत असते. नाराज झालेल्या मुनगंटीवार यांनी सरकारच्या पहिल्या अधिवेशनात भाग घेतला नाही. ते नितीन गडकरी यांनासुद्धा भेटले. जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली.

मंत्रिमंडळात माझे स्थान पक्के होते. तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीसुद्धा यादीत तुमचे नाव आहे असे मला सांगितले होते. मात्र ते कसे गहाळ झाले, कुठल्या शाईने माझे नाव लिहले होते हेच मलाच कळत नाही अशी तिखट आणि खोचक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती. याची दखल देवेंद्र फडणवीस यांना शेवटी घ्यावी लागली होती.

BJP leader Sudhir Mungantiwar performs a bhajan appealing to CM Devendra Fadnavis for re-entry into the state cabinet.
Devendra Fadnavis News : सगळं ठरलं होतं, बच्चू कडूंचा अर्ध्या रात्री मेसेज अन्..! फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम

सुधीर भाऊंना मोठे पद देणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले होते. मात्र ११ महिन्यांचा कार्यकाळ उलटून गेला. सुधीर मंत्रीमंडळाच्या बाहेरच आहेत. त्यांच्याकडे पक्षाने कुठलीच जबाबदारी दिलेली नाही. मध्यंतरी त्यांनी ‘ए वक्त भी गुजर जायेगा...' अशी भावना शेरोशायरीतून व्यक्त केली होती. त्यांची ही शायरीसुद्धा चर्चेचा विषय झाली होती. त्याचाही फारसा फयदा त्यांना झाला नाही. आता त्यांनी थेट भजनाच्या माध्यमातूनच ‘देवाभाऊ‘ कडे धावा घेतला असल्याचे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com