
Municipal Commissioner controversy : नागपूर महापालिकेत सुमारे साडेतीन वर्षांपासून अभिजित चौधरी प्रशासक आहे. ते नगरसेवकांचे ऐकत नाहीत, लोकांची कामे करीत नाही अशा सातत्याने तक्रारी केल्या जात आहे. विरोधकच नव्हे तर सत्ताधारी भाजपच्याही कार्यकर्त्यांचा हाच आरोप आहे.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा आयुक्तांना हटवण्याची मागणी केली होती. आता भाजपच्या महिला शहर अध्यक्ष तसेच माजी नगरसेविका प्रगती पाटील यांनी त्यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन करावे लागले. जोपर्यंत कामे सुरू होत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी ठाम भूमिका घेतल्याने महापालिकेत खळबळ उडाली होती. शेवटी प्रशासन हलले आणि तातडीने कामांना सुरुवात केली.
दोन महिन्यांपूर्वी शहरात झालेल्या अतिवृष्टीने धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. प्रगती पाटील यांच्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. रस्ते वाहून गेले. जागोजागी खड्डे पडले आहेत. पायाभूत सुविधा विस्कळीत झाल्या आहे. याची स्वतः आयुक्तांनी पाहणी केली होती.
या वस्तीत तातडीने कामे करण्याचे निर्देश आयुक्तांनी त्यावेळी दिले होते. या कामांची माहिती असणारे लेखी पत्र प्रगती पाटील यांनी त्यांना सोपवले होते. मात्र यापैकी एकही काम अद्याप झालेले नाही. ही कामे कुठे अडली आणि कोणी रोखली याचा शोध घेण्यासाठी प्रगती पाटील महापालिकेच्या धरमपेठ झोनमध्ये गेल्या असता त्यांना आयुक्तांना दिलेले निवेदनच गायब झाल्याचे समजले.
करावयाच्या विकास कामांची फाईलसुद्धा तयार झाली नाही. त्यामुळे चिडलेल्या प्रगती पाटील यांनी महापालिकेच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात ठिय्या आंदोलन पुकारले आहे. महापालिकेकडून ठोस कृती केली जात नाही तोपर्यंत आपण येथून जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने मनपा प्रशासनाने धाबे दणाणले होते.
महापालिका आयुक्तांना नागपुरातून हटवण्याची मागणी यापूर्वी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी केली होती. त्यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता. भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनीसुद्धा हीच मागणी केली होती. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात महापालिकेच्या बस कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर आयुक्तांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन स्वीकारण्यास नकार दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.