Pankaj Bhoyar language : 'मारहाण अयोग्यच, परंतु मराठी येणे अपेक्षित'; गृहराज्यमंत्री भोयर यांचा सल्ला

BJP Minister Pankaj Bhoyar Urges Patience on Maharashtra Language Row : गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी महाराष्ट्रात स्थायिक झाले असेल, इथं उद्योग धंदे करीत असतील, तर त्याला मराठी येणे अपेक्षित आहे.
Pankaj Bhoyar
Pankaj BhoyarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra language controversy : राज्यात मराठी आणि हिंदीवरून राज्यात चांगलाच वाद पेटला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी यावर टोकाची भूमिका घेतली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी बोलणास नकार देणाऱ्या एका व्यापाऱ्यास चोप दिला आहे. त्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे.

राज्यपालांनी क्षुद्र राजकारणासाठी या गोष्टी व्हायला नको, असे सांगून मारहाण करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. या भाषावादावर राज्याचे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सर्वांनाच सबुरीचा सल्ला दिला. महाराष्ट्रात कोणी स्थायिक झाले असेल, येथेच उद्योग धंदे करीत असतील तर त्याला मराठी येणे अपेक्षित आहे. मात्र यासाठी मारहाण करणे अयोग्य असल्याचेही ते म्हणाले.

महायुती (Mahayuti) सरकारने इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषणा म्हणून हिंदी भाषेचा आदेश काढला होता. त्यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. हिंदी सक्ती केल्या जात असल्याचा आरोप राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केला होता. या विरोधात आंदोलन करण्याचाही इशारा दिला होता.

दिल्लीच्या आदेशाने हिंदी भाषा लादली जात असल्याचा काँग्रेसचा (Congress) आरोप आहे. काँग्रेसनेही हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आक्रमक भूमिक घेतली आहे. अधिवेशन काळात वाद चिघळत असल्याचे बघून राज्य सरकारने आदेश मागे घेतला आहे. यासाठी एक समिती स्थापन केली आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र सभा घेऊन हिंदी सक्तीचा आदेश मागे घेतल्यानंतर विजयोत्सव साजरा केला होता.

Pankaj Bhoyar
Vijay Wadettiwar On Girish Mahajan : बाबू धीरज रखो... वडेट्टीवारांचा गिरीश महाजनांना सूचक इशारा

या दरम्यान मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली आणि हिंदी भाषकांच्या मोर्चाला परवानगी दिल्याने पुन्हा वाद पेटला होता. राज ठकरे यांना मराठी बोलणार नाही जे करायचे ते करा असे खुले आव्हान देणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या प्रतिष्ठानावर मनसेच्या कार्यकर्त्याने धडक दिली होती. त्यानंतर त्याने माफी मागून विषय संपवला होता. असे असले तरी भाषेवरून वादविवाद थांबताना दिसत नाही.

Pankaj Bhoyar
Mumbai bomb blasts investigation : मुंबई साखळी बॉम्बस्फोटप्रकरण; तपास अधिकाऱ्याचे मृत्यूप्रकरण पुन्हा चर्चेत...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करताना राज्यपालांनी पुन्हा मराठी हिंदी भाषेच्या वादाला स्पर्श केला. ते म्हणाले, "एखाद्या व्यक्तीला मराठी बोलता नसेल तर त्याला मारहाण केली जाते हे अयोग्य आहे. मारहाण करून कोणाल लगेच मराठी बोलता येणार नाही".

क्षुद्र राजकारणासाठी या गोष्टी महाराष्ट्रात व्हायला नको असेही राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण आपल्या भाषणात म्हणाले आहेत. यावर पंकज भोयर म्हणाले, "कोणीही कायदा हातात घेऊ नये. ज्यांना मराठी येत नसले तर त्याला सामंजस्याने आपली भूमिका समजावून सांगा, मारहाण करू नका". हिंदी भाषिकांनीसुद्धा तुम्हाला येथेच वास्तव्य करायचे असल्याने मराठी शिकून घ्यावी असा सल्ला भोयर यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com