

Chandrapur Cancer Hospital : चंद्रपूर इथल्या कॅन्सर हॉस्पिटलवरून, भाजपमधील स्थानिक नेते आमने-सामने आले आहेत. या हॉस्पिलटचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांच्या हस्ते उद्घाटन झालं. परंतु भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी हॉस्पिटलच्या उद्घाटनापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं पत्र समोर आल्यानं संतापले आहे. 'आमच्याच पक्षाच्या आमदाराने सरसंघचालकाच्या हस्ते उद्घाटनाला पत्र देऊन गालबोट लावण हे दुःखद आहे,' असा संताप मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आमदार जोरगेवार यांच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याने जिल्हाधिकारी कार्यालयातून त्या पत्राची प्रत मला आणून दिली. मग मला आश्चर्य वाटलं.
चंद्रपूरचं हे कॅन्सर हॉस्पिटल मी अतिशय पाठपुरावा करून, प्रामाणिकपणे मार्गी लावलं. रतन टाटांची इच्छा होती. त्यांनी या हॉस्पिटलसाठी 100 कोटी दिले. त्यांची इच्छा होती की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांचा हा जिल्हा आहे, तर त्यांच्याच हस्ते हॉस्पिटलचा उद्घाटन व्हावं."
'परंतु रतन टाटा राहिले नाहीत. परंतु दोन महिन्याभरापूर्वी मी (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटलो. कारण की त्यांचा वर्षभराचा कार्यक्रम अगोदरच निश्चित होत असतो. त्यांनी हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी 22 तारीख दिली. परंतु पुढे निवडणुकांच्या आचारसंहिता लागली. यावर आम्ही निवडणूक आयोगाचे आयुक्तांची भेट घेत, कार्यक्रम होणं किती गरजेचा आहे, याची माहिती दिली,' असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
'आम्ही निवडणूक आयोगाला विनंती केली की, आम्ही कोणीही स्टेजवर थांबणार नाही. फक्त सरसंघचालक हे स्टेजवर राहतील. कोणीही राजकीय भाष्य करणार नाही, फक्त हॉस्पिटलचे उद्घाटन होईल. आणि कार्यक्रम संपेल. कार्यक्रमांमध्ये कोठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची खबरदारी घेऊ, फक्त कार्यक्रमाला परवानगी द्या. यानंतर निवडणूक आयोगाने आमची मागणी मान्य करून कार्यक्रमाला परवानगी दिली. परंतु आमच्याच आमदारने सरसंघचालकांच्या कार्यक्रमापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना गालबोट लावणारे दिलेली पत्र दुःखद असे आहे,' असा संताप आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
आमदार जोरगेवार यांनी पत्रात काय म्हटले...
आमदार जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांना एक डिसेंबरला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कॅन्सर हॉस्पिटलमधील पाणीपुरवठा, मनुष्यबळ व अत्यावश्यक सोयी-सुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळे अर्धा-अपुऱ्या सोयीनिशी रुग्णालयाचे उद्घाटन होणे शक्य नाही व ते योग्यही नाही. त्यामुळे तातडीने बैठकी घेऊन, अपुऱ्या सुविधांवर उद्घाटनापूर्वी कार्यवाही होऊन, त्या मार्गी लावून पूर्ण क्षमतेने सुरू करता येईल, असे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.