Nagpur : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आज पुन्हा विधानसभेत संतापले. मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर सचिव त्यावर फुल्या मारतात. ते लोकप्रतिनिधींपेक्षा मोठे झाले का असा सवाल उपस्थित करून त्यांनी सरकारला धारेवर धरले.
आम्ही वेगवेगेळ्या आयुधांचा वापर करून लोकांचे प्रश्न उपस्थित करतो. मंत्र्यांकडून आश्वासन मिळवून घेतो. त्यावर 30 दिवसांच्या आत कार्यवाही करणे अपेक्षित आहे. मात्र संबंधित विभागाचे सचिव त्यावर नकारात्मक शेरे मारतात. सभागृहात मंत्री आमदारांच्या मागण्या ऐकतात. त्यानंतर आवश्यक असल्यास संपूर्ण होशमध्ये कुठलीही नाशापाणी न करता आश्वासने देतात. मी संगणक परिचारकांच्या वेतनाचा विषय 18 जुलै 25 रोजी विधानसभेत उपस्थित केला होता.
संबंधित मंत्र्याने वेतन देण्याचे आश्वासन दिले होते. विधानसभेच्या उपाध्यक्षांनी 30 दिवसात वेतन वितरित करण्याचे निर्देश दिले होते. मात्र एक वर्ष उलटून गेले. अद्यापही संगणक परिचारकांचे वेतन दिले नाही असे सांगून मुनगंटीवार यांनी सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त केला. आतापर्यंत यासाठी मी अकरा वेळा स्मरणपत्र दिले. मात्र अधिकारी त्याची दखल घेत नाही.
लोकप्रतिनिधींचा सन्मान केला जात आहे. हे अधिकारी मंत्र्यांपेक्षा मोठे झाले का असा सवाल त्यांनी केला. मुनगंटीवार यांनी मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची फाईल सभागृहातील चित्रीकरणाच्या क्यूआर कोडसह विधानसभा अध्यक्षांकडे सोपवली. गुरुवारी मुनगंटीवार यांनी सरकारच्या वाळू धोरणावरही जोरदार टीका केली. आपण वाळू माफिया जन्माला घालत आहोत. त्यापेक्षा वाळूचे मोफत वितरण करा.
बांधकामावर सेस लावा असे सांगून मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी उलट्या हाताने निर्णय घेऊ नका असेही महसूलमंत्र्यांना सुनावले. घरकूल योजनेवरूनही मुनगंटीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले. एकदाची बिरबलाची खिचडी शिजेल मात्र गोरगरिबांना घरकुलासाठी निधी येत नसल्याची टीका त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.