Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी विधिमंडळात सरकारचे वाभाडे काढले; 'ओयो'वर पोलिसांची छापेमारी

BJP MLA Sudhir Mungantiwar Assembly Remark Leads to Hotel Raid : पावसाळी अधिवेशनात भाजप माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित सरकारला धारेवर धरले होते.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur police hotel raid : पावसाळी अधिवेशनात भाजपचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून आपल्याच सरकारला धारेवर धरले होते. त्यांनी ओयो हॉटेलमध्ये चालत असलेल्या गैरकारभाराकडे लक्ष वेधले होते. सुसंस्कृत सरकारला हे शोभते काय? अशा शब्दात त्यांनी टीका केली होती.

यावर सभागृहात सरकारकडून फारसे गांभीर्याने उत्तर देण्यात आले नसले, तरी ओयो हॉटेल चालकांचे धाबे दणाणणले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांनी ओयो हॉटेलवर छापेमारी सुरू केली आहे. यात एकूण 15 हॉटेल आणि लॉज मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे हे 15 हॉटेल ओयोचा नकली ब्रँड वापरून अवैध व्यवसाय करीत असल्याचे समोर आले आहे.

संपूर्ण पावसाळी अधिवेशनात सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक भूमिकेत होते. त्यांनी चंद्रपूरचे भाजपचे (BJP) आमदार किशोर जोरगेवार यांच्यावरही निशाणा साधला होता. आपल्या मित्रासाठी जोरगेवार यांनी 95 लाखांचा निधी खर्च केला असल्याचा आरोप केला होता. यात त्यांना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही साथ दिली होती. हे बघून जोरगेवारांनी आम्हाला विरोधी पक्षनेत्याची गरज नाही, असा टोला मुनगंटीवार यांचे नाव न घेता लगावला होता.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुनगंटीवारांची भाजपमध्ये कोंडी होत असल्याचे सांगून त्यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. यावर मुनगंटीवार यांनी मी भाजपमध्ये खुश आहो आणि कोंडी वगैरेचा प्रश्नच उद्‍भवत नाही, असे सांगितले. प्रश्न उपस्थित करणे म्हणजे सरकारला विरोध करणे होत नाही, आमदार म्हणून जनतेची प्रश्न मांडणे हे आमदाराचे काम असते, असे स्पष्ट केले होते.

Sudhir Mungantiwar
Honey Trap Case Thane : हनी ट्रॅपची पाळंमुळं ठाण्यापर्यंत; राऊतांच्या थेट संकेतानं मोठं वादळ उभं राहणार?

मुनगंटीवार नाराज आहेत की नाही, हा वाद बाजूला ठेवला, तरी त्यांच्या आक्रमक भूमिकेची सरकारने गंभीर दखल घेतली असल्याचे दिसून येते. पोलिसांनी ओयो हॉटेल चालकांच्या विरोधात छापेमारी सुरू केली आहे. त्यांच्या आरोपांमुळे ओयो हॉटेलचे नोडल अधिकारी मनोज पाटील यांनी चंद्रपूर पोलिस ठाण्यात ओयो ब्रँडा दुरुपयोग केला जात असल्याची तक्रार केली.

Sudhir Mungantiwar
Chandrashekhar Bawankule:'हनी ट्रॅप'मध्ये अडकलेले चार मंत्री कोण? महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान

त्यानुसार चंद्रपूर पोलिसांनी शहरातील सर्व ओयोचे फलक लावलेल्या सर्व हॉटेलची झाडाझडती घेतली. त्यात अनेक हॉटेल चालक ओयोचा फलक लावून व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे यातील बहुतांश हॉटेल शासकीय अभियांत्रिक महाविद्यालयाच्या परिसरातील आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com