
थोडक्यात बातमी:
1.हनी ट्रॅपचा राजकीय स्फोट: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अधिवेशनात हनी ट्रॅपचा पेनड्राईव्ह असल्याचा दावा करत काही मंत्री व अधिकाऱ्यांवर आरोप केले; विजय वडेट्टीवार यांनी यामुळे महाविकास आघाडी सरकार पडल्याचा दावा केला.
2. बावनकुळेंचा विरोधकांवर पलटवार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरोप फेटाळले, हे प्रकरण म्हणजे लोकांची करमणूक आहे असे सांगून, विरोधकांकडे पुरावे असतील तर सभागृहात मांडायला हवे होते, असा सवाल केला.
3. अतिरिक्त मुद्द्यांवरही प्रतिक्रिया: मुंबई स्फोटक खटल्याच्या निकालाबाबत सरकारचा पुढील कायदेशीर विचार सुरू असून, राष्ट्रवादीतील मारहाणीवरही बावनकुळेंनी कायद्याचे पालन करण्याचा सल्ला दिला.
Nagpur News : सध्या राज्यात हनी ट्रॅपची जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी अधिवेशनात याकडे लक्ष वेधून आपल्याकडे याचा पेनड्राईव्ह असल्याचा दावा केला होता. मुख्यमंत्र्यांनसुद्धा याचे स्पष्टीकरण दिले असले तरी रोज नवनवे दावे आणि आरोप केले जात आहे. यावर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.(Revenue Minister Chandrashekhar Bawankule dismisses honey trap allegations involving four Mahayuti ministers, questions opposition's silence and demands clarity on claims)
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,लोकांची करमणूक करण्याचा हा प्रकार आहे. एवढेच होते विरोधक सभागृहात का बोलेल नाही, इतके दिवस का थांबले, असा सवाल करून विरोधकांच्याच नाकर्तेपणामुळे आघाडीचे सरकार कोसळले. यावेळी त्यांनी यात अडकलेले मंत्री कोण हे मला माहीत नाही, ज्यांनी आरोप केले, त्यांनाच विचार असंही सांगितले.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हनी ट्रॅपमुळे (Honey Trap Scandal) महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्याचा दावा केला आहे. नाना पटोले यांनी काही मंत्री आणि अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकले असल्याचा आरोप करीत आहेत. यावर बावनकुळे म्हणाले, हनी ट्रॅप वगैरे काही नाही. चार मंत्री कोण आहेत ते कुठले आहेत हे मला माहीत नाही.
ज्यांनी आरोप केले त्यांनाच ते माहीत असणार. सीडी लावा नाही तर काही कर कोणी घाबरणार नाही. एवढेच पुरावे होते तर विरोधकांनी सभागृहात का दिले नाही, भूमिका का मांडली नाही असा सवाल करून त्यांनी विकासावर काही बोलू शकत नसल्याने असे मुद्दे काढले जात आहे.
काही नेत्यांना स्फोटक वक्तव्ये करण्याची सवयच लागली आहे. एकनाथ खडसे यांनी आरोप केले म्हणजे ते सत्य होत नाही. कोणी कुणाचाही मित्र राहू शकतो. खडसे यांना नेहमीच गिरीश महाजन यांचे नाव घेत असता असेही बावनकुळे म्हणाले.
मुंबई स्फोटकाचा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यावर बोलणे योग्य नाही. याबाबत सरकार कुठे कमी पडले, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. वरच्या कोर्टात जाता येईल का याचा विचार केला जाईल.
सरकारकडे काही अतिरिक्त माहिती असेल तर वरच्या कोर्टात जाता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या हाणामारीवरही बावनकुळे यांनी हातात कायदा घेऊन चालणार नाही, आमदार, मंत्री व पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम केले पाहिजे असा सल्ला दिला.
1. प्रश्न: हनी ट्रॅप प्रकरणात कोणते नेते पुढे आले आहेत?
उत्तर: नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी यावर थेट आरोप केले आहेत.
2. प्रश्न: चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली?
उत्तर: त्यांनी आरोप फेटाळले आणि विरोधकांवर गंभीर टीका केली.
3. प्रश्न: हनी ट्रॅपमुळे महाविकास आघाडी कोसळली का?
उत्तर: काँग्रेसच्या म्हणण्यानुसार कोसळली, पण सत्ताधाऱ्यांनी ते नाकारले.
4. प्रश्न: सरकार पुढील कायदेशीर पावले उचलणार आहे का?
उत्तर: उच्च न्यायालयाच्या निकालावर सरकार पुढील कारवाईचा विचार करत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.