
Nagpur News : महायुती सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सांस्कृतिक मंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणली होती. ही वाघनाखांचे दर्शन घेता यावे यासाठी ती सध्या नागपूरमध्ये आणण्यात आली आहेत. सोबतच छत्रपतींच्या काही वास्तुंचे प्रदर्शन येथे भरवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि विद्यमान सांस्कृतिक खात्याचे मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. मात्र या कार्यक्रमाला सुधीर मुनगंटीवार उपस्थित नव्हते. त्यांना बोलावले नाही, तेच मुद्दाम आले नाही, मंत्रिमंडळात घेतले नसल्याने नाराज आहेत, अशा चर्चा कार्यक्रमात रंगल्या होत्या. या सर्व शंका-कुशंका स्वतः मुनगंटीवार यांनी आज दूर केल्या.
प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र कोणी नाराज होणार नाही. याची काळजी आपल्या भाषणातून घेतली. त्यांनी वाघनखे भारतात आणण्याचे श्रेय सुधीर मुनगंटीवार यांना दिले. आपल्या भाषणातून त्यांनी जाहीरपणे याचा उल्लेख केला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी मुनगंटीवार नागपूरमध्ये (Nagpur) आहे. काल कौटुंबिक कार्यक्रमामुळे जाऊ शकलो नाही, असे त्यांनी सांगितले.
मला सचिवांचा फोन आला होता. कार्यक्रमाला यायची इच्छासुद्धा होती असे सांगून त्यांनी आज आपण शिवरायांची नखे आणि प्रदर्शनाला भेट देणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) केलेल्या वक्तव्यावर त्यांनी यामुळे आणखी मेहनत करण्याची इच्छा निर्माण होते असे सांगितले.
असे असले तरी मुनगंटीवार यांनी मुद्दामच कार्यक्रमाला येण्याचे टाळल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळात समावेश केला नसल्याने चंद्रपूर वगळता ते इतर कार्यक्रमांमध्ये फारसे सहभागी होताना दिसत नाही. गडकरी यांच्या पुढाकाराने विदर्भातून निवडून आलेल्या सर्व भाजपच्या आमदारांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला होता. यात देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश होता. या कार्यक्रमालाही मुनगंटीवार यांनी दांडी मारली होती.
गडकरी आणि मुनगंटीवार यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत. मंत्रिमंडळात समावेश झाला नाही तेव्हा ते तत्काळ गडकरी यांना भेटायला गेले होते. या भेटीची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती. त्यावेळी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होते. मात्र ते एकदाही या काळात सभागृहात आले नाहीत. मंत्रीपदावरून भाजपमध्ये असंतोष निर्माण झाला असताना फडणवीस यांनी सुधीरभाऊंना मोठे पद देणार असल्याचे जाहीर केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.