
Nagpur News : सध्या रोजगाराचा विषय केंद्र आणि राज्य सरकारला चांगलाच तापदायक ठरत आहे. देशात आणि राज्यात बेरोजगारी वाढल्याचा सातत्याने आरोप केला जात आहे. महायुती सरकारनेही विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी रोजगाराची धास्ती घेतली होती. त्यांनी निवडणुकीपूर्वीच खाजगी कंपन्यांमध्ये प्रशिक्षण आणि रोजगार देऊन लाडका भाऊ योजना सुरू केली होती.
तत्पूर्वी नितीन गडकरी यांनी लोकसभेच्या निवडणुकीत मिहान प्रकल्पात एक लाख रोजगार देण्याची घोषणा केली होती. ती त्यांनी पूर्ण केली आहे. मिहान प्रकल्पात एक लाखांपेक्षा अधिक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचा दावा त्यांनी केला असून या सर्वांची नावे आपल्याकडे असल्याचे सांगितले.
गडकरी यांच्या पुढाकाराने विदर्भात गुंतवणुकीकरिता उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी 'ॲडव्हांटेज विदर्भ'चे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. अनेक मोठे उद्योगपती या कार्यक्रमाला उपस्थित होते.
गडकरी यांनी आपल्या भाषणात नागपूरच्या मिहान प्रकल्पात टाटा, टेक महिंद्रा, इन्फोसिस कंपन्या सुरू झाल्याचे सांगितले. यात एक लाखांपेक्षा अधिकार उपलब्ध झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा यासाठी सहकार्य केल्याचे गडकरी यांनी सांगितले. त्यामुळे गडकरी यांनी सांगतिल्या प्रमाणे करून दाखवले आहे.
गडकरी नेहमची वेगवेगळ्या घोषणा करीत असतात. कोट्यवधीचे प्रकल्प जाहीर करीत असतात. त्यात काही आश्चर्यकारक घोषणांचाही समावेश असतो. नागपूर (Nagpur) नागनदीतून बोट चालवण्याची त्यांच्या घोषणेवर विरोधक नेहमची टीका करताता. दाहा वर्षांपूर्वी त्यांनी ही घोषणा केली होती. मात्र अद्याप बोट सोडा बोटींगची व्यवस्थासुद्धा नागनदीत झाली नाही. मात्र यंदाच्या केंद्रीच्या बजेटमध्ये नागनदीच्या शुद्धीकरणासाठी सुमारे अडीचशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
मिहान प्रकल्पासाठी गडकरी नेहमची आग्रही राहिले आहेत. नागपूरच नव्हे तर विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे ते सांगत असतात. आता या प्रकल्पासाठी लागणारी नवीन धावपट्टी आणि नागपूर विमानतळाच्या विकासाच्या अडचणीसुद्धा दूर झाल्या आहेत. विशेष म्हणजे गडकरी वारंवार अधिकाऱ्यांना झापतात, वेळेत काम करण्याचा आग्रह धरतात, सर्वांसमोर खडसावातात. त्यामुळे विमानतळ विकास सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी आता गडकरी यांनाच अध्यक्ष करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.