Nagpur News : बदलापूरच्या घटनेवरून माहविकास आघाडीने महायुती सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. यात आता शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद हाणून पाडण्यासाठी भाजपच्या (BJP) महिलांनी कंबर कसली आहे.
आम्ही रस्त्यावर उतरून आघाडीच्या राजकारणाची. पोलखोल करणार असल्याचे भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रगती पाटील यांनी सांगितले. लाडक्या बहिणीला लाभ भेटू नये यासाठी आघाडीचा खटाटोप सुरू असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला.
लाडकी बहीण योजनेला (Ladki Bahin Yojana) प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. ते बघून महाविकस आघाडीच्या नेत्यांनी राजकारण सुरू केले आहे. राज्यात अशांतता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
शरद पवार यांनी महाराष्ट्राचा मणिपूर होत आहे असे सांगून दंगलीची शक्यता वर्तवली होती. महाराष्ट्र बंदच्या आडून राज्यात हिंसाचार मजवला जाण्याची भीती यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
कोलकाता येथे घडलेल्या घटनेचा शरद पवार (Sharad Pawar) व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी साधा निषेध व्यक्त केला नाही. मात्र बदलापूरच्या घटनेवरून राजकारण केले जात आहे. बदलापूरच्या घटना गंभीर आहे. राज्य सरकारने याची तातडीने दखल घेतली आहे. आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
जलदगती न्यायालयात खटला चालवण्यात येणार आहे. विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली आहे. सरकारच्यावतीने सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. मात्र आघाडीला या घटनेचे राजकारण करून बंदच्या आडून हिंसाचार घडवून आणायचा असल्याचा आरोप प्रगती पाटील यांनी केला. मात्र आम्ही माहाविकास आघडीचा डाव हाणून पडणार आहोत. याकरिता भाजपच्या महिला रस्त्यावर उतरणार आहेत.
तसेच बंदमध्ये सहभागी होऊ नका असे आवाहन करणार आहेत. लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचे मनसुबे उधळून लावले जातील असे प्रगती पाटील (Pragati Patil) यांनी सांगितले. या वेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकाळात घडलेल्या महिलांवर झालेल्या अत्याचाराची यादी वाचून दाखवली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.