वर्धा जिल्ह्यात भाजपला धक्का, पदाधिकारी व नगरसेवक शिवसेनेत दाखल...

डॉ. उमेश तुळसकर (Dr. Umesh Tulaskar) यांनी आज शिवबंधन बांधून घेऊन विधिवत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी तुळसकर यांचे स्वागत केले.
Dr. Umesh Tulaskar, Subhash Desai and other at Mumbai.
Dr. Umesh Tulaskar, Subhash Desai and other at Mumbai.Sarkarnama

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा उद्योगमंत्री https://www.sarkarnama.in/topic/subhash-desai यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा कार्यक्रम पार पडला. मागील दोन वर्षांत राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्यांचे प्रश्न योग्य रितीने सोडवत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या (Uddhav Thackeray) कार्याचा प्रभाव पडल्याने आम्ही शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे संबंधितांनी सांगितले.

जिल्ह्यातील हिंगणघाट नगर परिषदेचे नगरसेवक उच्चविद्याविभूषित प्रा. डॉ. उमेश तुळसकर, भाजप अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष आसिफ शेख सईद शेख यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी माजी खासदार व संपर्कप्रमुख अनंत गुढे, जिल्हा प्रमुख अनिल देवतारे, हिंगणघाट नगर परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे, हिंगणघाट शहरप्रमुख सतीश धोमने आदी उपस्थित होते.

डॉ. उमेश तुळसकर यांनी आज शिवबंधन बांधून घेऊन विधिवत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तुळसकर यांचे स्वागत केले. हिंगणघाट मतदार क्षेत्रात शिवसेना पक्ष बळकटीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावा, असे सांगितले. त्यास उत्तर देताना उमेश तुळसकर यांनी शिवबंधनाच्या या पवित्र संकल्पाचा एक दिलाने, एकजुटीने संधीचे सोने करू, असे सांगितले. याप्रसंगी नगरसेवक सतीश धोबे, नगरसेवक मनोज वर्घने, शिवसेना शहरप्रमुख सतीश ढोमणे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Dr. Umesh Tulaskar, Subhash Desai and other at Mumbai.
शिवसेना आमदाराकडून मुलाच्या लग्नाची पहिली पत्रिका बाळासाहेब ठाकरेंच्या चरणी अर्पण

भाजप पक्षातून शिवसेनेमध्ये प्रवेश घेणारे डॉक्टर उमेश तुळसकर हे अकरावे नगरसेवक आहेत. याअगोदर भाजपचे नऊ व एक अपक्ष अशा दहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. आता तुळसकर यांच्या प्रवेशामुळे ही संख्या वाढून अकरा झाली आहे. विशेष म्हणजे उमेश तुळसकर यांची हिंगणघाट व समुद्रपूर येथे शिक्षण क्षेत्रामध्ये चांगली पकड आहे. त्यामुळे त्याचे सकारात्मक परिणाम पक्षाला बघायला मिळतील, असे येथील राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com