Chandrashekhar Bawankule : राज्यात ‘ऑपरेशन लोटस'चे चंद्रशेखर बावनकुळे यांनीही दिले संकेत!

Operation Lotus in Maharashtra Politics : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात सत्तेत असलो, तरी ‘ऑपरेशन लोटस'चे संकेत दिल्याने महाविकास आघाडीने धसका घेतला आहे.
MLA Chandrashekhar Bawankule
MLA Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : महाविकास आघाडीचे अनेक खासदार आणि आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. भाजप पुन्हा ‘लोटस' अभियान राबवणार, फोडाफोडी करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनेक नेत्यांनी तसेच सुतेवाचसुद्धा केले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, "आम्हाला ऑफरेशन लोटस राबवण्याची गरज नाही. आपल्या खासदार, आमदारांना सांभाळून ठेवण्याची जबाबदारी त्या-त्या पक्षाच्या नेत्यांची असते. तो त्यांचा प्रश्न आहे. कोणी आमच्याकडे आले, तर त्यांचे स्वागत करण्याची भाजपची संस्कृती आहे. आघाडीतील नाराज झालेले कोणी आमच्याकडे आले, तर त्यांचे काय करायचे हे बघू, असे सांगून त्यांनीही या चर्चेला दुजोरा दिला.

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज नागपूरमध्ये पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "लोकसभेत आणि विधानसभेत निवडूण आलेल्या खासदार आणि आमदारांना त्यांचे पक्षच आणि प्रक्षप्रमुख विचारत नसल्याने ते अस्वस्थ आहेत. कोणी विचारत नसेल, विश्वासात घेत नसेल, निर्णय प्रक्रियेत ठेवत नसेल, तर नाराज होणे स्वाभाविक आहे". त्यांनी पक्ष सोडायचा की कायम राहायचे याचा निर्णय शेवटी त्यांनाच घ्यायचा आहे.

प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपल्या मतदारसंघात विकास करायचा असतो, जनतेची प्रश्न सोडावायची असतात. हे बघून अनेकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारतातासाठी काम करायचे आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले.

MLA Chandrashekhar Bawankule
Top 10 News : भाजप 'मविआ'चे खासदार फोडणार? गुलाबराव, केसरकर नव्या मंत्रिमंडळात नको- वाचा महत्वाच्या घडामोडी

"देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राहून मतदारांच्या विकासासाठी, मतदारसंघातील अनेक प्रश्न काहींना सोडवायचे आहेत. ते आम्हाला भेटतात. गाऱ्हाणी सांगतात. महायुतीत (Mahayuti) सत्तेत असल्याने आमच्या पक्षाच्यावतीने त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले जात आहे. याचा अर्थ ते लगेच राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल होतील, असा होत नाही. मात्र काहींनी इच्छा व्यक्त केली, तर आम्ही त्यांचे स्वागतच करू", असेही बावनकुळे यांनी सांगितले.

MLA Chandrashekhar Bawankule
Congress Group Leader : काँग्रेसचा गटनेता दिल्लीवाले ठरवणार; रस्सीखेच सुरू, वजन कोणाचे?

'ईव्हीएम'ला दोष...

'काँग्रेस, असो वा महाविकास आघाडी, यांच्याकडे मोठा पराभव झाल्याने सांगण्यासारखे काही नाही. निवडणुकीच्या आधीपासूनच त्यांच्तया बेबनाव होता. पराभवाचे खापर कोणावर, तरी फोडावेच लागते. त्यामुळे ते सर्व 'ईव्हीएम'ला दोष देत आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीला सामोरे जाताना त्यांना काही, तरी मुद्दा हवा आहे. त्यामुळे 'ईव्हीएम'च्या नावाने खडे फोडले जात आहे', असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

नाना पटोले यांना सल्ला...

नाना पटोले यांनी इतक्या कमी मताने का निवडून आले, याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पटोले यांचे निवडणूक एजंट अनिल वडपल्लीवार होते. त्यांनीच लाडकी बहीण आणि शेतकऱ्यांना दिलेली वीज माफी योजना बंद करावी, याकरिता कोर्टात धाव घेतली आहे. अशा लोकांना घेऊन प्रचार केला जात असले, तर लोकांकडून मतदानाची अपेक्षा त्यांनी का करावी, असाही सवाल यावेळी बावनकुळे यांनी केला.

पटोले आणि शरद पवार यांनी 'ईव्हीएम'वर मतदान केले. मतदान केल्यानंतर त्यांनी व्हीव्हीपॅट तपासले. संपूर्ण मतदान होईस्तोवर त्यांची 'ईव्हीएम'बाबत कुठलीच तक्रार नव्हती. निकाल लागल्यानंतरच त्यांना आता घोळ दिसू लागल्याचा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com