
Nagpur News : विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे. फक्त सोळा आमदार निवडून आलेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचाही दावाही काँग्रेसने गमावला आहे.
आता गटनेतेपदासाठी पक्षात रस्सीखेच सुरू असल्याचे दिसते. मात्र गटनेता कोणाला करायचे याचाही निर्णय दिल्लीतून होणार असल्याचे दिसते. गटनेता निवडण्याचा प्रस्ताव काँग्रेसच्यावतीने हायकमांडकडे पाठवण्यात आला आहे.
माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, "गट नेत्याचे नाव आम्ही आमच्यात चर्चा करून ठवणार आहोत. याच आठवड्यात याचा निर्णय होईल. दिल्लीतून मंजुरी आल्यानंतर नावाची घोषणा केली जाईल. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने भास्कर जाधव, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने जितेंद्र आव्हाड यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे".
विधानसभेत विरोधीपक्ष नेता निवडण्याइतके संख्याबळ महाविकास आघाडीतील एकाही पक्षाकडे नाही. शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाकडे 20 तर काँग्रेसकडे 16 आमदार आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १० आमदार निवडून आले आहेत.
विरोधी पक्षानेता निवडण्यासाठी 10 टक्के आमदारांची आवश्यकता असते. हा नियम असला तरी विधानसभेचे अध्यक्षांनी मान्यता दिल्यास विरोधी पक्षनेत्याची निवड करता येते. महाविकास आघाडीने एकत्रित प्रस्ताव दिल्यास विरोधी पक्षनेता निवडला जाऊ शकतो. मात्र यासाठी महाविकास आघाडीमध्ये एका नावावर एकमत होण्याची आवश्यकता आहे.
विजय वडेट्टीवार यांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेतेपद द्यायला तयार आहेत, हे आम्हाला विचारावे लागेल. त्यांनी होकार दिल्यास एक नाव ठरवून देऊ. विरोधी पक्षनेता द्यायचाच नसले, तर नाव कशाला द्यायचे, असे सांगितले.
'ईव्हीएम'वर इंडिया आघाडीतील सर्वच नेत्यांची चर्चा सुरू आहे. 'ईव्हीए'मध्ये घोळ आहे की, नाही हे स्पष्ट करता येत नसले, तरी लोकांना शंका आहे. जगातील एकमेव भारत देशातच 'ईव्हीएम'वर निवडणूक घेतल्या जाते. त्यामुळे यावर विश्वास कसा ठेवायचा, जे जगाने नाकारले ते आपण का स्वीकारायचे, असा प्रश्न आहे. यापुढील निवडणुका बॅलेटवर झाल्या पाहिजे. काँग्रेसची सत्ता असताना भाजपनेही 'ईव्हीएम'ला विरोध केला होता, याकडेही विजय वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.